लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत हद्दीतून जाणाºया राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील बिअरबार व दारूची दुकाने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला आहे. शासनाच्या या नव्या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे ११५ मद्यविक्रीची दुकाने पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकला झाला आहे. त्यामुळे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील राज्यउत्पादन शुल्क विभागात परवाना नूतनीकरणासाठी मोठी गर्दी पहायला मिळाली.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील ५०० मीटरच्या हद्दीतील दारू विक्रीची दुकाने व बिअरबार बंद करण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी घेतला होता. त्यानुसार १ एप्रिल २०१७ पासून अशा दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण थांबवून ते बंद करण्यात आले होते. जालना जिल्ह्यात एकूण ३५० परवानाधारक मद्यविक्रीची दुकाने व बिअरबार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या निर्यणानंतर जिल्ह्यातील २३० दुकाने बंद झाले होते. तर मद्यविक्री करणाºया ५० दुकादारांना धडपड करून आपली दुकाने इतरत्र स्थलांतरित केली होती. जालना शहरातील काही बिअरबार व मद्यविक्रीच्या दुकानांना अभय देण्यासाठी शहरालगतचे राज्यरस्ते पालिकेकडे हस्तांतरित करण्याचा ठराव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयानुसार महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती व कँन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून जाणाºया राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील मद्यविक्रीच्या दुकानांना मद्यविक्री बंदीचा निर्णय लागू असणार नाही. त्यामुळे जालना, भोकरदन, अंबड, परतूर या नगरपालिकांसह बदनापूर, मंठा, जाफराबाद व घनसावंगी नगरपंचायत क्षेत्रातील राज्य महामार्गावरील सुमारे ११५ दुकाने पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये जालना पालिका हद्दीतील ३० दुकानांचा समावेश आहे.
मद्याची ११५ दुकाने पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:45 IST