केज तालुक्यात ११५ वर्ग वाढणार !

By Admin | Updated: June 8, 2014 00:53 IST2014-06-08T00:37:22+5:302014-06-08T00:53:13+5:30

मधुकर सिरसट , केज बालकाचा मोफत सक्तीचा शिक्षण अधिकार २००९ प्रमाणे केज तालुक्यातील १०७ प्राथमिक शाळेत १६ जून पासून पाचवीचे वर्ग सुरू होणार आहेत.

115 class grow in Cage taluka! | केज तालुक्यात ११५ वर्ग वाढणार !

केज तालुक्यात ११५ वर्ग वाढणार !

मधुकर सिरसट , केज
बालकाचा मोफत सक्तीचा शिक्षण अधिकार २००९ प्रमाणे केज तालुक्यातील १०७ प्राथमिक शाळेत १६ जून पासून पाचवीचे वर्ग सुरू होणार आहेत. आठवीचे वर्ग फक्त आठ शाळेला जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे ११५ वर्गांची भर यामध्ये आणखी पडणार आहे. त्यासाठी ११५ शिक्षकांचीही त्या वर्गांसाठी नियुक्ती होणार असून संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना तसे आदेश वितरित करण्यात आले आहेत.
केज तालुक्यात सध्या २२२ प्राथमिक आणि ७ माध्यमिक अशा एकूण २२७ शाळा जिल्हा परिषदेमार्फत चालतात. सध्या लाभार्थ्यांना अध्यापनाची कामे करण्याकरिता एकूण ७९५ शिक्षक कार्यरत आहेत. त्यात पाचवीचे १०७ वर्ग आणि आठवीचे आठ वर्ग मिळून एकूण ११५ वर्गांची भर पडणार आहे. सध्याच्या ७९५ शिक्षकांतही ११५ शिक्षकांची भर पडून शिक्षकांची एकूण संख्या ९१० होणार आहे.
पाचवीचा वर्ग १ कि.मी.च्या आत अंतर असलेल्या शाळेत उघडण्यात येणार असून आठवीच्या वर्गासाठी ३ कि.मी. एवढे किमान अंतर निश्चित करण्यात आले आहेत. केज तालुक्यात एकूण १५ केंद्रीय शाळा असून केंद्र प्रमुखामार्फत त्या-त्या केंद्राचा कारभार चालतो. आठवीच्या उघडण्यात येणाऱ्या शाळेत सातेफळ, पिसेगाव, कोठी, नागझरी, सादोळा, पळसखेडा, बुरंडवाडी आणि घाटेवाडी या शाळांचा समावेश आहे. यामुळे पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय गावातील शाळेतच होणार आहे.
गुगल मॅपिंगवर नोंद
दोन शाळेतील प्रत्यक्ष अचूक अंतर नोंदविण्यासाठी भ्रमणध्वनी द्वारे गुगल मॅपिंग डाऊनलोड करून केज तालुक्यातील प्रत्येक शाळेचे अक्षांश,रेखांश आणि दोन शाळेतील अंतर याची नोंद गटशिक्षणाधिकारी महानुभव आणि ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एच.एस. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली २२७ प्राथमिक शाळांचे अंतर गुगल मॅपिंगवर अचुक नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे बोगस विद्यार्थी पटसंख्येला आळा बसणार असून एका क्लिकवर दोन शाळेचे अंतर समजणार आहे. गुगल मॅपिंगद्वारे राज्यात पाचवीचे १ हजार ५८८ तर आठवीचे २६० वर्ग सुरू होणार आहेत. केज तालुक्यात पाचवीचे १०७ तर आठवीचे ८ वर्ग मिळून एकूण ११५ वर्ग १६ जूनपासून सुरू होणार आहेत. या वर्गाला अध्यापन करण्यासाठी योग्य त्या शिक्षकांची नियुक्ती केली आहे.

Web Title: 115 class grow in Cage taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.