शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांकडे १ कोटी ९३ लाखांची वीजबिल थकबाकी

By admin | Updated: July 19, 2014 00:45 IST

किनवट : तालुक्यातील ५ हजार ९८९ कृषीपंपधारकांकडे मुद्दल, व्याज व दंडासह ३१ कोटी ५० लाख रुपये थकबाकी आहे. घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक अशा २२ हजार १०० ग्राहकांकडे १ कोटी ९३ लाख रुपयांची थकबाकी आहे

किनवट : तालुक्यातील ५ हजार ९८९ कृषीपंपधारकांकडे मुद्दल, व्याज व दंडासह ३१ कोटी ५० लाख रुपये थकबाकी आहे. घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक अशा २२ हजार १०० ग्राहकांकडे १ कोटी ९३ लाख रुपयांची थकबाकी आहे. शहरातील वीज ग्राहकांकडे ५० टक्के बाकी असल्याने थकबाकीचा भरणा न केल्यास किनवट शहरावर भारनियमनाची शक्यता आहे.तालुक्यात ६ हजार ६४८ कृषी पंपधारक असून पैकी ५ हजार ९८९ कृषीपंपधारक हे थकबाकीदार आहेत. मुद्दल, व्याज, दंडापोटी ३१ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी कृषी पंपापोटी असल्याची माहिती हाती आली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने कृषी ग्राहकांकडील वीजबिल थकबाकीमध्ये सवलत देण्यासाठी कृषी संजीवनी योजना- २०१४ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत कृषी ग्राहकांचे ३१ मार्च २०१४ रोजी थकित असलेले पूर्ण व्याज व दंड महावितरण कंपनीतर्फे माफ करण्यात येणार आहे. तर मूळ रकमेच्या ५० टक्के रक्कम एकरकमी किंवा तीन हप्त्यात भरण्याची सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार पहिला हप्ता २० टक्के ३१ आॅगस्ट २०१४ पर्यत, दुसरा हप्ता ३० सप्टेंबरपर्यंत, ३१ आॅक्टोबरपर्यंत कमीत कमी १० टक्के रक्कम तिसरा हप्ता भरण्यासाठी सवलत दिली आहे. या योजनेअंतर्गत १७ कोटी रुपये व्याज, दंडापोटी १४ कोटी १५ लाख रुपये मुद्दल रकमेपोटी माफ होणार आहे. आता कृषी संजीवनी योजनेअंतर्गत ७ कोटी ७ लाख रुपयेच कृषी पंपधारकांना भरावे लागणार आहेत. यामुळे आता २४ कोटी ४३ लाख रुपये या योजनेत भाग घेतला तर माफ होणार आहेत, अशी माहिती सहायक अभियंता व्ही. पी. जोगी यांनी दिली. तालुक्यातील २० हजार ६०० घरगुती वीज ग्राहकांकडे १ कोटी ६२ लाख रुपयांची, व्यवसायिक १ हजार २०० ग्राहकांकडे २३ लाख रुपयांची व औद्योगिक ३०० ग्राहकांकडे ८ लाख ४० हजार रुपयांची अशी एकूण २२ हजार १०० ग्राहकांकडे १ कोटी ९३ लाख रुपयांची थकबाकी आहे. वसुलीसाठी लवकरच मोठी वसुली मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही जोगी यांनी सांगितले. (वार्ताहर)