शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील ११० रस्ते स्मार्ट करा; समितीच्या पाहणीनंतरच होणार मनपाकडे हस्तांतरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 13:35 IST

छत्रपती संभाजीनगरात ‘स्मार्ट सिटी’मार्फत २७५ कोटींचे ११० रस्ते,प्रशासक जी. श्रीकांत यांनी नेमली अधिकाऱ्यांची समिती, लवकरच पाहणी

छत्रपती संभाजीनगर : स्मार्ट सिटी’मार्फत शहरातील ११० रस्ते सिमेंट पद्धतीने गुळगुळीत करण्यात आले. त्यावरून वाहतूकही सुरू झाली. अनेक रस्त्यांवर सिमेंटचे गट्टू बसवले नाहीत. जलवाहिन्यांसाठी रस्ता अर्धवट सोडला आहे. अतिक्रमणे, रस्ता रुंदीकरण आदी कारणांमुळे कामे पूर्ण झाली नाहीत. ही कामे पूर्ण झाल्यावरच रस्त्यांचे हस्तांतरण मनपाकडे केले जाईल. आतापर्यंत एकही रस्ता हस्तांतरित झालेला नाही. सोमवारी सकाळी प्रशासक जी. श्रीकांत यांनी रस्त्यांची पाहणी करून १०० टक्के काम पूर्ण झाल्याची खात्री करूनच हस्तांतरण करण्यासाठी अधिकाऱ्यांची समिती नेमली.

२०२२ मध्ये स्मार्ट सिटीने शहरातील ११० रस्त्यांसाठी ३१७ कोटींची तीन निविदा प्रसिद्ध केल्या. ए.जी. कन्स्ट्रक्शन कंपनीने तिन्ही निविदा १५, १५ आणि ११ टक्के कमी दराने भरल्या. त्यामुळे एकाच एजन्सीला सर्व कामे मिळाली. कमी दरामुळे स्मार्ट सिटीच्या ४२ कोटींची बचत झाली. मागील तीन वर्षांपासून रस्त्याची कामे सुरू आहेत. १०६ रस्त्यांची कामे १०० टक्के पूर्ण झाली. मयूर पार्क, सैनिक विहार कांचनवाडी, आनंद गाडे चौक, ऑरेंज सिटी येथील रस्त्यांची कामे ९० टक्के पूर्ण झाली. काही कामे तांत्रिक अडचणींमुळे पूर्ण झालेली नाहीत.

जी. श्रीकांत यांनी संपूर्ण योजनेचा आढावा घेतला. पूर्ण झालेले रस्ते हस्तांतरित का केले नाहीत, असा प्रश्न केला. त्यावर अधिकारी निरुत्तर झाले. वॉर्ड अभियंते, कार्यकारी अभियंते रस्ते, सहसंचालक नगररचना, अतिक्रमण हटाव पथक प्रमुख अशा अधिकाऱ्यांची समिती त्यांनी नेमली. समितीने प्रत्येक रस्त्याची पाहणी करावी, त्रुटी दूर कराव्यात, काम पूर्ण झाले याची खात्री झाल्यावरच हस्तांतरित करण्याचे आदेश दिले.

सप्टेंबरपर्यंतची अंतिम मुदत

स्मार्ट सिटीच्या कंत्राटदार कंपनीने सप्टेंबरअखेरपर्यंत सर्व छोटी-मोठी कामे संपवून हस्तांतरण प्रक्रियाही संपवावी. त्यानंतर मुदतवाढ मिळणार नसल्याचे प्रशासकांनी सांगितले. हस्तांतरण झाल्याशिवाय उर्वरित रक्कम कंत्राटदाराला दिली जाणार नाही, असेही त्यांनी बजावले. स्मार्ट सिटीच्या कंत्राटदाराला आतापर्यंत जवळपास २०० कोटींहून अधिक रक्कम देण्यात आली आहे. ७० ते ७५ कोटी रुपये अद्याप देणे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

८ ते ९ ठिकाणी सरफेस खराबस्मार्ट सिटीने ११० पैकी ८ ते ९ रस्त्यांवरील सरफेस खराब असल्याचे कंत्राटदाराच्या निदर्शनास आणून दिले आहे. जिथे सरफेस खराब आहे, तो भाग पुन्हा नव्याने करावा, असे निर्देश दिले आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतरच हस्तांतरण होईल.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSmart Cityस्मार्ट सिटी