११ खडी मशीनला ठोकले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2017 00:20 IST2017-06-13T00:20:15+5:302017-06-13T00:20:50+5:30
सेलू : तीन महिन्यांचा अॅग्रीम महसूल न भरल्यामुळे महसूल प्रशासनाने तालुक्यातील ११ खडी मशिनला ६ जून रोजी सील ठोकले आहे;

११ खडी मशीनला ठोकले सील
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : तीन महिन्यांचा अॅग्रीम महसूल न भरल्यामुळे महसूल प्रशासनाने तालुक्यातील ११ खडी मशिनला ६ जून रोजी सील ठोकले आहे; परंतु, मंडळ अधिकाऱ्यांनी या कार्यवाहीचा अहवाल अद्यापही तहसील कार्यालयात दाखल केलेला नाही.
सेलू तालुक्यामध्ये ११ खडी मशिन आहेत. यामध्ये तांदूळवाडी येथे ४, आडगाव, देवगावफाटा, नांदगाव, हादगाव, पिंप्राळा इ. शिवारात मशीन आहेत. खडी मशीन चालकांकडून गौण खनिज महसूल म्हणून तीन महिन्याला किमान १ लाख रुपये महसूल भरून घेण्यात येतो. परंतु, तालुक्यातील या ११ ही खडी मशिनचालकांनी सन २०१७-१८ चा तीन महिन्यांचा अग्रीम महसूल भरला नाही. त्यामुळे तहसीलदार आसाराम छडीदार यांनी खडी मशीनला सील करण्याचे आदेश मंडळ अधिकाऱ्यांना बजावले होते. त्यानुसार ६ जून रोजी मंडळ अधिकारी योगेंद्र नांदापूरकर, अमर जोरगेवार, सुनील गोडघासे यांच्यासह तलाठी कुऱ्हेवाड, कटारे, मोमीलवार यांनी ११ खडी मशीनला सील ठोकले आहे. एकाच वेळी सर्व खडी मशीन बंद झाल्याने बांधकाम व्यवसायावर परिणाम झाला आहे.