११ कलमी कामांची योजना रखडली !
By Admin | Updated: January 15, 2017 01:04 IST2017-01-15T01:03:30+5:302017-01-15T01:04:00+5:30
बीड : ग्रामीण भागाच्या विकासकामांतून रोजगारनिर्मिती करण्याच्या हेतूने सुरु करण्यात आलेल्या समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेच्या सुरुवातीलाच घरघर लागली आहे

११ कलमी कामांची योजना रखडली !
बीड : ग्रामीण भागाच्या विकासकामांतून रोजगारनिर्मिती करण्याच्या हेतूने सुरु करण्यात आलेल्या समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेच्या सुरुवातीलाच घरघर लागली आहे. ११ प्रकारच्या कामांचा समावेश असलेल्या या योजनेतून जिल्ह्यात हजारो कामे करण्यास शासनाने परवागनी दिली आहे; परंतु प्रशासकीय अनास्थेमुळे दोन महिन्यांपासून जिल्ह्यात एकाही कामाला सुरुवात झालेली नाही.
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना (मग्रारोहयो) अंतर्गत ही कामे राबवायची आहेत. प्रलंबित कामे नव्या कामांत समाविष्ट करुन नरेगा आयुक्त अभय महाजन यांनी जिल्ह्याला कामांचे उद्दिष्ट दिले होते. जिल्हा परिषद, महसूल विभाग, कृषी विभाग व वनविभागातर्फे ही कामे करायची आहेत. मात्र, अद्याप प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. जिल्हा परिषदेच्या यंत्रणेमार्फत ही कामे राबविण्यात येणार असून, पंचायत समितीमार्फत जिल्हा कक्षाकडे प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव येणार आहेत. मात्र, प्रशासकीय मान्यतेचे घोडे पंचायत समिती स्तरावरच अडकलेले आहे. त्यामुळे पुढील प्रक्रिया रखडलेली आहे.