३ वर्षांत १००० रुग्णांचा मृत्यू!

By Admin | Updated: May 13, 2014 00:56 IST2014-05-13T00:39:38+5:302014-05-13T00:56:38+5:30

मुजीब देवणीकर , औरंगाबाद घरगुती, किरकोळ कारणावरून शहर व परिसरात जाळून घेणार्‍यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.

1000 deaths in 3 years! | ३ वर्षांत १००० रुग्णांचा मृत्यू!

३ वर्षांत १००० रुग्णांचा मृत्यू!

मुजीब देवणीकर , औरंगाबाद घरगुती, किरकोळ कारणावरून शहर व परिसरात जाळून घेणार्‍यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मागील तीन वर्षांमध्ये घाटीच्या बर्न विभागात १४२३ रुग्ण दाखल झाले. त्यातील १ हजार ३० जणांनी मृत्यूला कवटाळले. उर्वरित ३९३ रुग्णांना जीवदान देण्यात या विभागाला यश आले. वैद्यकीय क्षेत्रही चिंतेत मागील वर्षी मराठवाड्यात गंभीर दुष्काळ पडला. शेतकर्‍यांना काहीच काम नव्हते. घरात किरकोळ कारणावरून वाद झाला की, कर्ता पुरुष किंवा महिला जाळून घेत असत. यंदाही गारपिटीने शेतकर्‍यांना शिवारात पाय ठेवायची गरज नाही. कामच नसल्याने घरात कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कुरबुरी सुरू होतात. त्याचे पर्यवसान भांडणात होते आणि शेवट अत्यंत विदारक होत आहे. ग्रामीण भागात जाळून घेणार्‍यांचे प्रमाण वाढल्याने वैद्यकीय क्षेत्रही चिंतेत आहे. रुग्णांच्या किंकाळ्या... घाटीत दररोज किमान चार तरी रुग्ण जळालेल्या अवस्थेत येतात. प्रत्येक रुग्ण ३० ते ८० टक्के जळालेला असतो. त्याच्यावर प्रभावी उपचार करून जीव वाचविणे हे बर्न विभागाच्या डॉक्टरांसमोर मोठे आव्हान असते. छाती आणि डोके हे दोन अवयव जळालेले असतील तर रुग्ण वाचण्याची शक्यता कमीच असते. घाटीत आलेल्या रुग्णाला सर्वप्रथम औषधोपचार सुरू करून संपूर्ण शरीराला ड्रेसिंग करण्यात येते. रुग्णाच्या किंकाळ्या ऐकून दगडालाही पाझर फुटू शकतो. घाटीत जेथे जळालेल्या रुग्णांवर औषधोपचार करण्यात येतात, तेथे नातेवाईकांना अजिबात प्रवेश नाही. कारण नातेवाईकांच्या इन्फेक्शनमुळे रुग्ण लवकर दगावण्याची शक्यता असते. वॉर्डातील इन्फेक्शनचे प्रमाण कमी करण्यात संबंधित विभागाला मागील काही वर्षांमध्ये यश आले आहे. महागडी औषधी, इंजेक्शन आणि रक्त देण्याची प्रक्रिया अविरतपणे सुरू असते. घाटीत अनेकदा रक्ताचा तुटवडा असतो. तेव्हा रुग्णांच्या नातेवाईकांना बरीच कसरत करावी लागते. अनेक रुग्णांच्या नातेवाईकाकडे तर विकतचे रक्त आणण्याएवढेही पैसे नसतात. राजीव गांधी जीवनदायी योजनेत आता रुग्णांना महागडी औषधी आणि औषधीद्वारे दिले जाणारे खाद्य मिळत आहे. काही इंजेक्शन तीन ते चार हजार रुपयांपर्यंत येतात. अशा इंजेक्शनचा पुरवठा अत्यंत कमी होतो. जो रुग्ण वाचू शकतो, त्यालाच हे इंजेक्शन दिल्या जाते, असे घाटीच्या सूत्रांनी सांगितले. जळालेल्या रुग्णांवर महिनोन्महिने उपचार सुरू असतात. नागरिक जळालेल्या रुग्णाला खाजगी दवाखान्यात नेतात. तेथे आठ दिवसांतच तीन ते चार लाख रुपये खर्च होतात. पैसे संपल्यावर अनेक रुग्ण घाटीत येतात. घाटीत आलेल्या प्रत्येक रुग्णावर औषधोपचार करणे डॉक्टरांना क्रमप्राप्त आहे.

Web Title: 1000 deaths in 3 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.