शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी १०० जणांचे उपोषण
By Admin | Updated: June 24, 2014 00:42 IST2014-06-24T00:25:19+5:302014-06-24T00:42:31+5:30
जिंतूर : जिंतूर विधानसभा मतदार संघातील शेतकरी, विद्यार्थी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १०० कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांच्या

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी १०० जणांचे उपोषण
जिंतूर : जिंतूर विधानसभा मतदार संघातील शेतकरी, विद्यार्थी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १०० कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे़
येथील तहसील कार्यालयासमोर २३ जूनपासून हे बेमुदत उपोषण सुरू झाले आहे़ जिंतूर-सेलू विधानसभा मतदार संघातील गारपीट व अतिवृष्टी झालेल्या शेतीचे पंचनामे अनेक ठिकाणी झाले नाहीत़ अनेकांना मदतीपासून डावलण्यात आले़ प्रलंबित अनुदान बँकेमार्फत धिम्या गतीने वाटप होत आहे़, सन २०१४-१५ खरीप व रबी हंगामाकरीता नवीन कर्जपुरवठा तत्काळ करण्यात यावा शिवाय महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे दत्तक असलेल्या गावांना कर्जपुरवठा करण्यास बँक टाळाटाळ करीत आहे़ यामुळे काही गावे स्टेट बँक आॅफ इंडिया व स्टेट बँक आॅफ हैदराबाद यांना जोडावीत, शेतकरी बांधवांना बैलजोडी, ठिबक सिंचन, शेतीपूरक व्यवसाय, पाईपलाईन, विहीर खोदकाम, गोदाम बांधकामाकरीता बँकेकडून कर्जपुरवठा तत्काळ व्हावा, राजीव गांधी घरकूल योजना व शैक्षणिक कर्ज बँकांकडून तत्काळ वाटप करावे, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार मंजूषा लटपटे यांना देण्यात आले़ निवेदनावर राकाँचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे, तालुकाध्यक्ष शरद अंभोरे, विधानसभा अध्यक्ष प्रसाद बुधवंत, नानासाहेब राऊत, शौकतलाला, विश्वनाथ राठोड, गजानन कांगणे, गजानन चव्हाण, वाकळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते़ (वार्ताहर)
आंदोलन तीव्र करणार
शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर प्रशासनाने तत्काळ दखल न घेतल्यास २४ जून रोजी रास्ता रोको, २५ रोजी मोर्चा व त्यानंतर जिंतूर शहर बंद करण्यात येईल, याउपरही प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करू असा इशारा विधानसभा अध्यक्ष प्रसाद बुधवंत यांनी दिला़