नगराध्यक्षपदासाठी १० जणांची उमेदवारी दाखल
By Admin | Updated: July 16, 2014 01:24 IST2014-07-15T23:58:27+5:302014-07-16T01:24:29+5:30
बीड : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगराध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम पार पडत आहे़ १९ जुलै रोजी सहाही पालिकांमध्ये या निवडी पार पडणार आहेत़

नगराध्यक्षपदासाठी १० जणांची उमेदवारी दाखल
बीड : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगराध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम पार पडत आहे़ १९ जुलै रोजी सहाही पालिकांमध्ये या निवडी पार पडणार असून सोमवारी सहा जागांसाठी १० उमेदवारांनी अर्ज दाखल केले़ परळी, धारुर पालिकेमध्ये चुरस असून, बीड, गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई येथे एक अर्ज आल्यामुळे तेथील चित्र स्पष्ट झाले आहे़
सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरावयाचे होते़ बीड पालिकेसाठी रत्नमाला बाबूराव दुधाळ यांचा एकमेव अर्ज आला आहे़ गेवराईमध्ये नगराध्यक्षपदासाठी महेश भगवान दाभाडे यांचे दोन अर्ज आले आहेत़
माजलगावमध्ये शिवसेनेच्या पंचशीला अविनाश जावळे यांचा एकमेव अर्ज आला आहे़ अंबाजोगाईमध्ये विद्यमान नगराध्यक्षा रचना सुरेश मोदी यांचा एकच अर्ज आहे़ त्यामुळे या चारही जणांचे नगराध्यक्षपद निश्चित मानले जात असून, केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे़ धारुरमध्ये नगराध्यक्षपदासाठी तीन अर्ज आले़ यात भाजपाच्या सुनीता सुनील पिलाजी, राष्ट्रवादीकडून गोदावरी लक्ष्मण सिरसट, माधव अंबादास निर्मळ यांचे अर्ज आले आहेत़
परळीमध्ये तिघांचे ८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत़ परळी पालिकेची सदस्य संख्या ३२ आहे़ राष्ट्रवादी काँग्रेस ८, भाजप संलग्न आघाडी ९ व अपक्ष १ असे बहुमत राष्ट्रवादीकडे आहे़
राष्ट्रवादीकडून बाजीराव धर्माधिकारी, काँग्रेसकडून प्रा़ विजय मुंडे तर भाजपकडून कुसुम चाटे यांनी उमेदवारी दाखल केली़ प्रा़ मुंडे, धर्माधिकारी यांच्यात खरी स्पर्धा आहे़ (प्रतिनिधींकडून)
पालिकाप्रवर्गसत्ताधारी पक्ष
बीडओबीसी महिलाराष्ट्रवादी
गेवराईखुलाभाजप
माजलगावमागासवर्गीय महिलाभाजप
धारुरखुलाराष्ट्रवादी
अंबाजोगाईओबीसी महिलाअंबाजोगाई विकास आघाडी
परळीखुलाराष्ट्रवादी
बीडमध्ये रत्नमाला दुधाळ, गेवराईत महेश दाभाडे, माजलगावात पंचशीला जावळे, ंअंबाजोगाईत रचना मोदी यांच्या निवडीची केवळ घोषणाच बाकी़