जूनअखेर मालमत्ताकर भरल्यास १० टक्के सूट

By Admin | Updated: June 6, 2014 01:08 IST2014-06-06T00:13:52+5:302014-06-06T01:08:28+5:30

नांदेड : मालमत्ता कराचा आॅनलाईन भरणा करणार्‍या मालमत्ताधारकांना त्यांच्या मालमत्ता करात दोन टक्के जादा सूट देण्यात येणार आहे़

10% discount if the property tax is paid by the end of June | जूनअखेर मालमत्ताकर भरल्यास १० टक्के सूट

जूनअखेर मालमत्ताकर भरल्यास १० टक्के सूट

नांदेड : मालमत्ता कराचा आॅनलाईन भरणा करणार्‍या मालमत्ताधारकांना त्यांच्या मालमत्ता करात दोन टक्के जादा सूट देण्यात येणार आहे़ जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मागणी बील आणि कर पावतीचा कागद वाचवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आह़े
बील कलेक्टरकडे प्रत्यक्ष रोख किंवा धनादेशाद्वारे कराचा भरणा करणार्‍यांना ही सवलत लागू राहणार नाही़ या सुविधेचा सर्व मालमत्ताधारकांनी लाभ घेऊन आपल्या जबाबदारीसोबतच राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन आयुक्त जी़ श्रीकांत यांनी केले आहे़ २०१४- १५ या वर्षाचा मालमत्ता कर जून २०१४ अखेर भरल्यास मिळणारी ८ टक्के आणि आॅनलाईन भरल्यानंतर २ टक्के अशी १० टक्के सूट मिळणार आहे़ ही सवलत ३० जून पर्यंत सुरू राहणार आहे़ मनपा आयुक्तांनी जानेवारी महिन्यात झोननिहाय घेतलेल्या समाधान शिबिरामध्ये नियमित आणि कराचा अग्रीम भरणा करणार्‍या मालमत्ताधारकांनी अग्रीम स्वरूपात एकरकमी वार्षिक कर भरणार्‍या करदात्यांसाठी योजना जाहीर करण्याची मागणी केली होती़ असे केल्यास मनपास वेगवेगळ्या कर्जावर लागणार्‍या व्याजाचा भार कमी होऊन करदात्यांनाही दिलासा मिळेल़ असा प्रस्ताव त्यांनी सुचवला होता़ त्यावर प्रशासनाने विचार करून तो स्थायी समितीकडे पाठवल्यानंतर २८ फेब्रुवारी रोजीच्या सभेत सर्वानुमते मंजूर झाला होता़
सन २०१४- १५ या वर्षाचा मालमत्ता कर भरण्यासाठी सवलतींचे वेगवेगळे तीन त्रैमासिक टप्पे करण्यात आले आहेत़ एप्रिल ते जून २०१४ या कालावधीत आॅनलाईन कर भरल्यास १० टक्के तर जुलै ते सप्टेंबर आणि आॅक्टोबर ते डिसेंबर अशा वेगवेगळ्या कालावधीत आॅनलाईन कर भरणार्‍या मालमत्ताधारकांना अनुक्रमे ७ व ५ टक्के सूट दिली जाणार आहे़ जानेवारी े ते मार्च २०१५ या दरम्यान कर भरणार्‍यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही़ (प्रतिनिधी)

Web Title: 10% discount if the property tax is paid by the end of June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.