१० कोटीची टेंडर प्रक्रिया लटकली

By Admin | Updated: December 5, 2014 00:52 IST2014-12-05T00:45:21+5:302014-12-05T00:52:07+5:30

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत विविध प्रकारच्या ९३ कामांची टेंडर प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. मात्र १२ नोव्हेंंबरपासून बंद पडलेली वेबसाईट अद्यापही सुरु झालेली नाही.

10 crore tender process hangs out | १० कोटीची टेंडर प्रक्रिया लटकली

१० कोटीची टेंडर प्रक्रिया लटकली


उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत विविध प्रकारच्या ९३ कामांची टेंडर प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. मात्र १२ नोव्हेंंबरपासून बंद पडलेली वेबसाईट अद्यापही सुरु झालेली नाही. त्यामुळे जवळपास १० कोटींची टेंडर प्रक्रिया लटकली आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत सर्वच कामांचे ई-टेंडरिंग करण्यात येत आहे. यामुळे प्रशासनाचा वेळ आणि खर्चामध्येही बचत झाली आहे. ग्रामपंचायत स्तरावरील विविध प्रकारच्या ९३ कामांचे ई-टेंडरिंगची सर्व तयारी करण्यात आली होती. या एकूण कामांची अंदाजित किंमत १० कोटीच्या आसपास आहे. सदरील ई-टेंडरिंग ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याबाबत ग्रामपंचायतींना डेडलाईन देण्यात आली होती. मात्र १२ नोव्हेंबरपासून शासनाचे ‘महा-टेंडर’ हे संकेतस्थळ बंद पडले आहे. याबाबत जिल्हा परिषदेकडून शासनाना पत्रही देण्यात आले आहे. मात्र आजपावेतो हे संकेतस्थळ सुरु झालेले नाही. त्यामुळे जवळपास ९३ कामांचे ई-टेंडरिंग रखडले आहे. परिणामी या कामांना सुरुवात करण्यात आणखी विलंब होणार आहे. (प्रतिनिधी)४
स्वच्छ भारत अभियान कक्षाचे काम करण्यात येणार आहे. यासाठीही १६ लाखांचा निधी मंजूर आहे. मात्र सदरील टेंडर प्रक्रियाही वेबसाईट बंद पडल्याने ठप्प आहे. यासोबतच अन्य विभागांतर्गतच्या कामांचे ई-टेंडरिंग लांबणीवर पडल्याचे सांगण्यात येत आहे.
४बांधकाम विभागांतर्गत विविध कामाच्या ई-टेंडरिंगची प्रक्रिया सुरु असतानाच संबंधित संकेतस्थळ बंद पडले आहे. त्यामुळे या प्रक्रियेला विलंब होत आहे. संकेतस्थळ सुरु होताच प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता ओ.के. सय्यद यांनी सांगितले.

Web Title: 10 crore tender process hangs out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.