शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

१८ लाखांत १ किलो सोने देतो म्हणून गंडविले !

By admin | Updated: November 16, 2014 23:38 IST

लातूर : ‘१८ लाख रुपयांत १ किलो सोने देतो’ म्हणून दोघांनी अहमदपुरातील एकाला फसविल्याची घटना उघडकीस आली आहे.

लातूर : ‘१८ लाख रुपयांत १ किलो सोने देतो’ म्हणून दोघांनी अहमदपुरातील एकाला फसविल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, दोघांना लातूर ग्रामीण पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून १२ लाख ११ हजार रुपयांसह एक कारही जप्त करण्यात आली आहे. अहमदपूर येथील बाबूराव नरहरी कानगुले (वय ५१, रा़अहमदपूर) यांना दोन तरुणांनी ‘१८ लाखांमध्ये १ किलो सोने देतो’ म्हणून ८ नोव्हेंबर रोजी त्यांच्याकडून १६ लाख रुपये घेतले़ यापूर्वी २० दिवसाच्या फरकाने २ लाख रुपये घेतले होते. नंतर १६ लाख असे एकूण १८ लाख रुपये घेतले. परंतु, सोने न देताच फसवणूक करुन ते पळून गेले़ सोने न देता या पैशातून त्या दोघांनी जुनी कार खरेदी केली. गोव्याचा दौराही केला़ या प्रकरणी अहमदपूर येथील बाबुराव नरहरी कानगुले यांनी शनिवारी लातूर ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली़ या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना आरोपी लातुरात येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीवर सहाय्यक सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, स्थानिक गुन्हे शाखेचे एएसआय कोमवाड, संजय भोसले, राजेंद्र टेकाळे, बाळासाहेब मस्के, बळवंत गरड, शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे रामचंद्र ढगे यांनी पाळत ठेवून सापळा रचला. बाभळगाव नाका परिसरात एमएच २१ व्ही ८८८३ या कारसह या दोघांना पकडले. यावेळी त्यांच्याकडील १२ लाख ११ हजार रुपयेही जप्त केले. रविवारी रात्री उशिरा या दोघांनाही ताब्यात घेतले़ ताब्यात घेण्यात आलेला राहुल बाबुराव कांबळे हा चाकूर तालुक्यातील लातूररोड परिसरातील रहिवासी आहे. तर श्रीनिवास केरबा शिंदे हा चाकूर तालुक्यातील तेलगावचा आहे. या दोघांनाही अटक केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी सांगितले. पुढील तपास भातलवंडे करीत आहेत. दरम्यान, फसवणूक करणाऱ्या दोघा आरोपींना पीसीआर मिळाला असून, त्यांच्याकडून आणखी कोणाची फसवणूक झाली आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत, असेही पोलिस निरीक्षक भातलवंडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)लातूर ग्रामीण तसेच स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून राहुल बाबुराव कांबळे व श्रीनिवास केरबा शिंदे या दोघांना अटक केली. रविवारी या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १९ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.