बसच्या धडकेत १ ठार
By Admin | Updated: May 14, 2014 01:00 IST2014-05-14T00:53:26+5:302014-05-14T01:00:40+5:30
जवळा बाजार: जवळा - औंढा रस्त्यावरील वगरवाडीजवळील धाब्यासमोर ट्रकच्या क्लिनरला खासगी बसची धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला

बसच्या धडकेत १ ठार
जवळा बाजार: जवळा - औंढा रस्त्यावरील वगरवाडीजवळील धाब्यासमोर ट्रकच्या क्लिनरला खासगी बसची धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ११ मे रोजीच्या मध्यरात्री २ वाजता घडली. हैदराबाद येथील ट्रक क्र. आर. जी. ०१५ - जीए ६७२ वगरवाडीजवळील एका धाब्यावर टायरची हवा चेक करण्यासाठी थांबला होता. ट्रकमधील क्लिनर पप्पू खान (वय १५, रा. धनियाना, राजस्थान) हा खाली उतरला असता सोलापूरहून नागपूरकडे जाणारी खासगी बस एम. एच. ३८ - पी १९७७ च्या चालकाने बस भरधाव व निष्काळजीपणे चालवून सदरील क्लिनरला जोराची धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला असता त्यास औंढा येथील रूग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. सदर बसचालकाने धडक देऊन हिंगोलीकडे जात असताना गस्तीवर असलेले वसमतचे उपविभागीय पोलिस अधिकारी पियूष जगताप यांनी नाकेबंदी करून पोलिस उपनिरीक्षक पाटेकर यांनी बस ताब्यात घेतली. सदर बस जप्त करून चालकावर हट्टा ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी सपोनि अशोक चाटे, किशोर पोटे, प्रभाकर भोंग, शंकर हेंद्रे यांनी घटनास्थळाला भेट दिली. (वार्ताहर)