अपघातात १ ठार; तिघे गंभीर जखमी

By Admin | Updated: June 6, 2014 01:10 IST2014-06-06T00:08:19+5:302014-06-06T01:10:08+5:30

हिंगोली : भरधाव वेगाने जाणार्‍या अज्ञात वाहनाची आॅटोरिक्षास धडक बसून झालेल्या अपघातात एकजण ठार झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले.

1 killed in accident; Three seriously injured | अपघातात १ ठार; तिघे गंभीर जखमी

अपघातात १ ठार; तिघे गंभीर जखमी

हिंगोली : भरधाव वेगाने जाणार्‍या अज्ञात वाहनाची आॅटोरिक्षास धडक बसून झालेल्या अपघातात एकजण ठार झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना ४ जूनच्या रात्री हिंगोली-सेनगाव रस्त्यावरील खुडज पाटीजवळ घडली असून अपघातात जखमी झालेल्या तिघांवर हिंगोली येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सेनगाव तालुक्यातील तळणी येथील काही भाविक रिधोरा येथे भजनाच्या कार्यक्रमासाठी आॅटोमधून जात असताना हा अपघात झाला. तळणीचे गजानन खनपटे, चालक मनोहर खनपटे, जानकाबाई सीताराम खनपटे, वच्छला राजाराम खनपटे (सर्व रा. तळणी), ज्ञानेश्वर बापुराव राखोंडे रा. नालेगाव ता. औंढा नागनाथ) हे सर्वजण आॅटोरिक्षा (क्र. एमएच ३८-५०२१) मध्ये बसून ४ जून रोजी रिधोरा येथे भजनाचा कार्यक्रम ऐकण्यासाठी निघाले होते. तळणी ते रिधोरा दरम्यान खुडज पाटीजवळ बुधवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास हिंगोलीवरून सेनगावकडे भरधाव वेगाने जात असलेल्या अज्ञात वाहन चालकाने आॅटोला धडक दिली. या अपघातामध्ये आॅटोरिक्षा उलटून त्यातील भाविक जखमी झाले. रात्री परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान भाऊराव मल्हारी कोरडे (वय ३८, रा. तळणी) यांचा मृत्यू झाला. तर जानकाबाई सीताराम खनपटे (७०), वच्छला राजाराम खनपटे (वय ५५, सर्व रा. तळणी), ज्ञानेश्वर बापूराव राखोंडे (३०, रा.नालेगाव) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. मयत भाऊराव मल्हारी कोरडे यांच्या पश्चात पाच भाऊ, पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.
दरम्यान, जिल्हा रूग्णालयातील पोलीस चौकीचे जमादार ए. आर. राठोड, पोकॉ रवी इंगळे यांनी याबाबतची कागदपत्रे नर्सी पोलीस ठाण्याकडे पाठवली आहेत. परंतू गुरूवारी रात्री उशिरापर्यंत अज्ञात वाहन चालकावर नर्सी पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता. मयत भाऊराव कोरडे यांच्या पार्थिवावर तळणी येथे ५ जून रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)
सेनगाव तालुक्यातील तळणी येथील काही भाविक रिधोरा येथे भजनाच्या कार्यक्रमासाठी आॅटोमधून जात असताना हा अपघात झाला.
तळणी ते रिधोरा दरम्यान खुडज पाटीजवळ बुधवारी रात्री हिंगोलीवरून सेनगावकडे भरधाव वेगाने जात असलेल्या अज्ञात वाहन चालकाने आॅटोला धडक दिली.
या अपघातामध्ये आॅटोरिक्षा उलटून त्यातील भाविक जखमी झाले. परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना हिंगोलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले
तळणी येथे मयत भाऊराव कोरडे यांच्या पार्थिवावर तळणी येथे ५ जून रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही.

Web Title: 1 killed in accident; Three seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.