शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

पालोदजवळ खासगी बस उलटली; एकाचा मृत्यू, 21 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 11:31 IST

यात्रेकरूंना गंगासागर येथे घेऊन जाणारी खासगी बस पालोदजवळ रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देयात्रेकरूंना गंगासागर येथे घेऊन जाणारी खासगी बस पालोदजवळ रस्त्याच्या कडेला पलटीअपघातात एकाचा मृत्यू झाला असून 21 प्रवाशी जखमीजखमींपैकी 13 प्रवाशी हे गंभीर जखमी

सिल्लोड - यात्रेकरूंना गंगासागर येथे घेऊन जाणारी खासगी बस पालोदजवळ रस्त्याच्या कडेला उलटली असल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 21 प्रवाशी जखमी झाले आहे. जखमींपैकी 13 प्रवाशी हे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांना औरंगाबाद येथे उपचारसाठी हलवण्यात आले आहे. खाजगी बस खराब रस्ते, दाट धुके आणि नशेत असलेल्या चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक आहे. 

मिळलेल्या माहितीनुसार, दामोदर लक्ष्मण खैरनार यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.  खैरनार हे मुंबईचे रहिवासी असून हे बेस्टमधून वर्षभरापूर्वी निवृत्त झाले होते. ते पत्नी व नातेवाईकांसह गंगासागरला जात होते. ते पत्नी व नातेवाईकांसह गंगासागरला जात होते. या अपघातात त्यांची पत्नी जयश्री दामोदर खैरनार ९ वय 53 रा.पिंपळगाव वाभाडी जि. नाशिक ) यासुद्धा जखमी आहेत. जखमीमध्ये सर्व जेष्ठ नागरिक असून, घटना घडल्यानंतर चालक फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि किरण  बिडवे, अजिंठा पोलीस ठाण्याचे सपोनि किरण आहेर, कर्मचारी भगवान भिसे यांनी घटनास्थळावरून पोलीस वाहनातून जखमींना उपचारासाठी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

अपघातात जखमी झालेल्या प्रवास्यांची नावे अशी:सखुबाई कचरू पांडव वय 55 वर्ष रा. नाशिक, सविता अरुण परे वय 40 वर्ष रा. वडोदबाजार  ता.फुलब्रि,इंदूबाई कैलास महाजन रा.सातपूर जि.नाशिक, कमल तुकाराम सानप वय 50 वर्ष रा. नाशिक,सुनंदा रेवती सांगळे वय 55 रा. नाशिक, विजया दिनकरराव शेळके वय 59 रा. सातपूर जि. नाशिक, सुनंदा नामदेव मोरे वय 51 वर्ष रा.मुंबई, निर्मळ संतोष खैरनार वय 64 वर्ष रा.मुंबई, अरुण गोपाळ गांगुर्डे वय 60 वर्ष रा. नाशिक, मंदाकिनी विजय पगारे वय 62 रा.धुळे,भास्कर कारभारी गांगुर्डे वय 54 वर्ष रा.आडगाव जिल्हा नाशिक, सुमन काळू कडाळे वय 50 वर्ष रा. आडगाव जिल्हा नाशिक, सुनंदा सुखदेव शिंदे वय 61 वर्ष रा.आडगाव जि. नाशिक, सुखदेव खडु शिंदे वय 67 वर्ष रा.आडगाव जि. नाशिक, कुसुम निंबा पवार वय 55 वर्ष रा. नाशिक, जिजाबाई बाबुराव नर्गे वय 60 वर्ष रा. नागापूर ता. नांदगाव,शकुंतला अर्जुन बोडखे वय 59 वर्ष रा. नाशिक, ललिता अरुण गांगुर्डे वय 53 वर्ष रा. नाशिक, मंगुला गोरखनाथ पगारे वय 53 रा.सटाणा जि. नाशिक, सिमा भिकाजी केवट वय 50 वर्ष रा. वडोदबाजार ता.फ़ुलंब्री, , कोळीबा जनार्दन घाटे वय 56 वर्ष रा. नाशिक, काळू झुंबर कडाळे वय 67 रा.आडगाव जि. नाशिक असे आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यूAccidentअपघात