१ कोटी रुपयांचे धनादेश बाऊन्स
By Admin | Updated: June 16, 2014 01:10 IST2014-06-16T00:51:42+5:302014-06-16T01:10:45+5:30
औरंगाबाद : महापालिकेच्या करसंकलन मोहिमेत मालमत्ता करापोटी आलेले सुमारे १ कोटी रुपयांचे धनादेश बाऊन्स झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

१ कोटी रुपयांचे धनादेश बाऊन्स
औरंगाबाद : महापालिकेच्या करसंकलन मोहिमेत मालमत्ता करापोटी आलेले सुमारे १ कोटी रुपयांचे धनादेश बाऊन्स झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. बँक खात्यात रक्कम नसताना पालिकेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ६ मालमत्ताधारकांच्या मालमत्ता सील करण्याची कारवाई प्रशासनाने केली. ३१ मार्च २०१४ पर्यंत मनपाने पाणीपट्टी आणि मालमत्ता कर वसुलीतून सुमारे ९५ कोटी रुपयांचा महसूल गोळा केला. त्या करातून बहुतांश रक्कम ही धनादेशाद्वारे मिळाली आहे. कारवाई टाळण्यासाठी काही मालमत्ताधारक धनादेश देऊन पालिकेच्या पथकाला परत लावतात. असे वारंवार घडते. मात्र, पालिका त्या मालमत्ताधारकांवर काहीही कारवाई करीत नाही.
१ लाख ८९ हजार मालमत्तांना नोटिसा
चालू आर्थिक वर्षातील कर मागणीसाठी १ लाख ८९ हजार मालमत्तांना करनोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामध्ये २२ हजार मालमत्ता व्यावसायिक आहेत. नोटिसांची छपाई व वाटपाचे काम प्रभाग कार्यालयांना विभागून देण्यात आले आहे. तसेच नावात दुरुस्ती करण्याचे अधिकारही प्रभागांना दिले आहेत. यापूर्वी नोटीस छापणे व नावात दुरुस्तीचे अधिकार मुख्यालयात होते.