शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

किराणा दुकानात १ कोटींची कॅश; 'हवाला'च्या डायरीत 'पीएम' एजन्सीचे नाव,करोडो रुपयांच्या नोंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 12:37 IST

छाप्यात पोलिसांनी दोन डायऱ्या जप्त केल्या आहेत. या डायऱ्यांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या नोंदी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

औरंगाबाद : चेलीपुरा भागातील सुरेश राईस किराणा दुकानावर गुन्हे शाखेच्या पथकाने मारलेल्या छाप्यात 'हवाला'च्या माध्यमातून आलेले १ कोटी ९ लाख ५० हजार रुपये जप्त केले. या दुकानातून मागील अनेक दिवसांपासून हवालामार्फत व्यवहार होत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या डायरीत हवालाच्या कोट्यवधी रुपयांच्या नोंदी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक कल्याण शेळके यांच्या पथकाने चेलीपुरा भागातील किराणा व्यापारी आशिष रमेशचंद्र साहुजी यांच्या सुरेश राईस किराणा दुकानावर मंगळवारी सायंकाळी छापा मारून १ कोटी ९ लाख ५० हजार रुपये जप्त केले. या छाप्यात पोलिसांनी दोन डायऱ्या जप्त केल्या आहेत. या डायऱ्यांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या नोंदी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

'पीएम' नावाच्या एजन्सीसाठी सावजी हे काम करीत होते. मोबाईल फोनवर येणाऱ्या कोडच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीचे टोपणनाव लिहून पैसे दिले जात होते. तसेच पैसे जमा करण्यात येत होते. या व्यवहाराची अधिकृतपणे कोठेही नोंद करण्यात येत नव्हती. डायरीत होणारी नोंदच अधिकृत होती, असेही पुढे आले आहे. दरम्यान, व्यापारी आशिष सावजी यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल केले आहे. पोलिसांनी पैसे, डायऱ्यांसह मोबाईल जप्त केल्यानंतर त्यांना नोटीस देऊन सोडून दिले. सावजी यांचा अधिकृतपणे जबाब नोंदवून पोलीस त्याचा सविस्तर अहवाल आयकर विभागाला देतील. त्यानंतर आयकर विभाग नागपूर कार्यालयाच्या परवानगीने जप्त केलेले पैसे बँक खात्यात जमा करतील. त्यानंतर सावजींकडे पैशाच्या स्त्रोंताविषयी चौकशी करतील, असे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अर्धा टक्का कमिशनहवालाचा व्यवहार संभाळणाऱ्यांना शक्यतो अर्धा टक्का कमिशन संबंधित व्यवहारावर मिळते, अशी माहिती आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. सावजी यांनी पोलिसांच्या छाप्याविषयी एजन्सीला कळविल्यानंतर त्यांनी हात वर केल्यामुळे त्यांना धक्का बसल्याचे सूत्रांनी सांगितले.

सुरक्षेसाठी स्वतंत्र गार्डपोलिसांनी हवालाचे पैसे सांभाळण्यासाठी आयुक्तालयात स्वतंत्र बंदूकधारी गार्ड लावला असल्याचे समोर आले आहे. या व्यवहारातील पैसे आयकर विभागाकडे द्यावे लागतात. त्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी ही दक्षता घेतली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस