शहरं
Join us  
Trending Stories
1
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
2
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
3
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
5
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
6
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
7
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
8
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
10
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
13
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
14
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
15
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
16
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
17
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
18
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
19
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
20
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील झी बाजाराला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 05:00 IST

रविवारी दिवसभर झी बाजार सुरू होता. त्यानंतर रात्री येथील सर्व कर्मचारी निघून झी बाजार बंद करण्यात आला. दरम्यान, रात्री १.३० वाजताच्या सुमारास झी बाजाराला अचानक आग लागली. झी बाजारात कपडे, प्लास्टिकचे साहित्य असल्याने आगीने क्षणार्धात रौद्र रुप धारण केले. आगीचे प्रचंड लोळ उठत होते. दरम्यान, याची माहिती पोलिसांनाही देण्यात आली.

ठळक मुद्देकोट्यवधींचे नुकसान : कपडे, प्लास्टिकच्या वस्तू, खेळण्याचे साहित्य जळून खाक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील जयंत टाकीज चौकात अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या झी बाजाराला रविवारी पहाटे १.३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कपडे, प्लास्टिकचे साहित्य, खेळण्याचे साहित्य आदी वस्तू पूर्णत: जळून खाक झाल्याने ३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.शहरातील मध्यवर्ती ठिकाणी जयंत टॉकीज चौकात मागील अनेक वर्षांपासून झी बाजार नियमित सुरू आहे. रविवारी दिवसभर झी बाजार सुरू होता. त्यानंतर रात्री येथील सर्व कर्मचारी निघून झी बाजार बंद करण्यात आला. दरम्यान, रात्री १.३० वाजताच्या सुमारास झी बाजाराला अचानक आग लागली. झी बाजारात कपडे, प्लास्टिकचे साहित्य असल्याने आगीने क्षणार्धात रौद्र रुप धारण केले. आगीचे प्रचंड लोळ उठत होते. दरम्यान, याची माहिती पोलिसांनाही देण्यात आली.त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जवळपास १७ अग्निशमन दलाच्या गाडया घटनास्थळी दाखल झाल्या. आगीच्या ज्वाला निघत असल्याने दुरुन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र यात यश येत नव्हते. त्यानंतर जेसीबी आणून त्याच्या सहाय्याने इमारतीचे छत तोडून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. सकाळी ७ वाजताच्या सुमारास आगीच्या ज्वाळा शांत झाल्या. मात्र आतून आग धुमसतच होती. त्यामुळे अग्निशमन पथकाकडून सोमवारी दिवसभर आग विझविणे सुरूच होते.या आगीत कोट्यवधीचे साहित्य होते. ते सर्व जळून खाक झाले. शहर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. आग कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र शार्टसर्कीटमुळे आग लागली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे, सदर झी बाजार हे मागील महिन्यात बंद होते आता पुन्हा नुकतेच सुरू झाले होते.उनी वस्त्रांची दुकाने हलविलीयाच झी बाजाराला लागून तिबेटीयन लोकांचे उनी कपडयांची दुकाने लागली होती. मात्र ही आग वेळीच लक्षात आल्याने उनी कपडयांचे गाठोडे बांधून ते रस्त्यावर जमा करून ठेवल्याने पुढील अनर्थ टळला.सकाळी उसळली गर्दीसदर आग रात्रीच्या सुमारास लागली. त्यामुळे याची माहिती अनेकांना झाली नाही. मात्र पहाटे नागरिक आझाद बागेत फिरायला येऊ लागल्यानंतर झी बाजाराला आग लागल्याची वार्ता सर्वत्र पसरली. त्यानंतर बघ्याची एकच गर्दी उसळली. चंद्रपूर शहर पोलिसांनी दंगा नियंत्रण पथकासह घटनास्थळी दाखल होऊन गर्दीवर नियंत्रण मिळविले.जीवितहानी टळलीया झी बाजारात सुमारे ३०-४० कर्मचारी काम करतात. यात महिलांचाही समावेश आहे. दिवसभर सर्व कर्मचारी या गजबजलेल्या झी बाजारातच असतात. सदर आग दिवसाच्या सुमारास लागली असती तर एकच तारांबळ उडून मोठा अनर्थ ओढवला असता. मात्र आग सर्व कर्मचारी निघून गेल्यावर रात्रीच्या सुमारास लागली. त्यामुळ जिवितहानी झाली नाही.

टॅग्स :fireआग