वाघाच्या हल्ल्यात कामगार ठार, चंद्रपुरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 10:27 IST2022-02-17T10:20:27+5:302022-02-17T10:27:47+5:30

बुधवारी रात्रीच्या सुमारास कामावरून सायकलने घरी परतत असलेल्या कामगारावर वाघाने हल्ला चढवून ठार केले.

worker killed in tiger attack near chandrapur super thermal power station | वाघाच्या हल्ल्यात कामगार ठार, चंद्रपुरातील घटना

वाघाच्या हल्ल्यात कामगार ठार, चंद्रपुरातील घटना

चंद्रपूर : वीज निर्मीती केंद्रातील कुणाल एंटरप्राइजेस या कंत्राटी कंपनीत कार्यरत कामगाराला वाघाने ठार केल्याची घटना समोर आली आहे. 

चंद्रपूर वीज केंद्र परिसरात ही घटना घडली आहे. भोजराज मेश्राम (वय ५८, रा. वैद्यनगर तुकूम) असे मृत कामगाराचे नाव आहे. ते बुधवारी रात्री साडे दहाच्या दरम्यान काम आटोपून सायकलने घरी परतत होते. दरम्यान, रस्त्यात वाघाने त्यांच्यावर हल्ला चढविला व उचलून नेले. त्यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी मिळाला. त्यांची सायकल रस्त्यावर पडून होती. 

गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वाघ फिरत आहे. याबाबत २ दिवसांपूर्वी वीज केंद्राने वनविभागाला माहिती दिली होती. दरम्यान, वाघाने कामगाराचा ठार केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

Web Title: worker killed in tiger attack near chandrapur super thermal power station