स्थानिक वाहतूकदाराला डावलून परप्रातीयांना काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:34 IST2021-09-17T04:34:07+5:302021-09-17T04:34:07+5:30
घुग्घुस : वेकोली वणी क्षेत्रातील कोळसा वाहतूकदाराकडून स्थानिक पल्ला व ट्रक मालकांना डावलून परप्रांतीयाच्या ट्रक मालकांना कोळसा वाहतुकीचे काम ...

स्थानिक वाहतूकदाराला डावलून परप्रातीयांना काम
घुग्घुस : वेकोली वणी क्षेत्रातील कोळसा वाहतूकदाराकडून स्थानिक पल्ला व ट्रक मालकांना डावलून परप्रांतीयाच्या ट्रक मालकांना कोळसा वाहतुकीचे काम देऊन स्थानिक ट्रक धारकावर अन्याय करीत असल्याने गुरुवारी दुपारी नायगाव चेक पोस्टवर आपले ट्रक रस्त्यावर उभे करून विविध ट्रक मालकांनी धरणे दिले. यावेळी वेकोली व कोळसा वाहतूकदाराच्या विरोधात नारेबाजी करीत संताप व्यक्त केला.
न्याय न मिळाल्यास मोठे आंदोलन उभारण्याचे संकेत यावेळी संतप्त आंदोलनकर्त्यांनी दिले. या परिसरात कोळसा खाणी असून कोळसा वाहतुकीचे ठेकेदार स्थानिक वाहतूकदाराना वगळून आंध्र, उत्तर व मध्यप्रदेशाच्या ट्रक मालकांना कोळसा वाहतुकीचे काम देतात. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बाहेरील प्रांतांचे पासिंग असलेले ट्रक काम करीत असून उपप्रादेशिक वाहतूक कार्यालयाने परवाने तपासणी केल्यास कर बुडव्याचे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता यावेळी आंदोलनकर्त्यांनी वर्तविली.