शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

स्वामीनाथन आयोगाच्या पुढे जाऊन भाजपाचे शेतकऱ्यांसाठी कार्य - सुधीर मुनगंटीवार

By admin | Updated: April 11, 2016 01:13 IST

शेतकरी हा केंद्रबिंदू माणून भारतीय जनता पक्ष कार्य करीत आहे. स्वामीनाथन आयोगाच्या पुढे जाऊन भाजपा शेतकऱ्यांसाठी कार्यरत आहे.

पदाधिकाऱ्यांची उपस्थिती : राजुरा-बामणी मार्गाच्या डांबरीकरणाचा शुभारंभराजुरा : शेतकरी हा केंद्रबिंदू माणून भारतीय जनता पक्ष कार्य करीत आहे. स्वामीनाथन आयोगाच्या पुढे जाऊन भाजपा शेतकऱ्यांसाठी कार्यरत आहे. या आयोगाच्या अनेक शिफारशीच्या समतुल्य अनेक कल्याणकारी योजना आम्ही कार्यान्वित केल्या आहे. अर्थसंकल्पच शेतकऱ्यांना समर्पित करण्यात आला असून २६ हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या विकासाच्या योजनेसाठी केलेली आहे. अशी माहिती राजुरा येथील पत्रकारांशी बोलताना राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सागितले. ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी कृषी गुरूकुल योजना, गाव स्मार्ट योजना, जलयुक्त शिवार योजना यासह अनेक योजना शेतकऱ्यांसाठी असून स्वामीनाथन आयोगात ज्या शिफारशी आहे. त्यापेक्षा पुढे जाऊन त्यातील शिफारशींपेक्षा चांगल्या योजना भाजपा शासनाने शेतकऱ्यासाठी आणल्या आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी आमचे शासन कटिबद्ध आहे, अशी माहिती पत्रकारांसोबत बोलताना दिली.राजुरा येथील पंचायत समिती चौकात राजुरापासून बामणी पर्यंतच्या डांबरीकरणाचा शुभारंभ ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. पाच कोटी खर्च करून मे अखेरपर्यंत राजुरा-बामणी मार्ग तयार होणार आहे. याप्रसंगी राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रातील सर्व रस्ते पूर्ण करून दळणवळणाच्या सोई सुकर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे, नगरसेवक राहुल पावडे, वाघु गेडाम, भाजयुमो अध्यक्ष सचिन डोहे, अरुण मस्की, शिवाजी शेलोकर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन बंडू बोडे यांनी केले. आभार बादल बेले यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)