Will conduct a survey of 2 lakh 3 thousand families | ४ लाख २२ हजार कुटुंबांचे करणार सर्वेक्षण
४ लाख २२ हजार कुटुंबांचे करणार सर्वेक्षण

ठळक मुद्देराहुल कर्डिले : कृष्ठरुग्ण क्षयरूण शोध व असंसर्गजन्य रोग प्रतिबंध अभियान

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जागरूकता अभियान १३ ते २८ सप्टेंबर २०१९ दरम्यान राबवण्यात येणार आहे. सदर अभियान पोलिओच्या धर्तीवर राबवण्यात येत येत आहे. अभियानादरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी व निवडक कारपोरेशन क्षेत्रातील ४ लाख२२ हजार ६५५ कुटुंबापर्यंत आरोग्य कर्मचारी घरोघरी भेट देणार आहेत. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
कुष्ठरोग निर्मूलनाकरीता सर्वेक्षण करणार आहे. निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरित उपचार करण्यात येणार आहे. यामध्ये कृष्ठरोग आजारात त्वचेवर फिकट लालसर बधीर चट्टा, त्या ठिकाणी घाम न येणे, तेलकट चकाकणारी त्याच्या त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे, तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे, बधिरपणा अथवा जखमा असणे, हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, हात मनगटापासून किंवा पाय घोट्यापासून लुळा पडणे, त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे, हात पाय यामध्ये अशक्त अशक्तपणा जाणवणे हातातून वस्तू गळून पडणे, चालताना पायातील चप्पल गळून पडणे इत्यादी लक्षणे आढळून येतात. क्षयरोगांमध्ये दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला ताप, वजनात लक्षणीय घट, थुंकी वाटे रक्त येणे, मानेवरील गाठी, इत्यादी लक्षणे आढळून येतात. तरी क्षयरोगाचे निदानाकरिता रुग्णांचा शोध घेऊन त्यांना औषधोपचार देण्यात येणार आहे.
असंसर्गजन्य आजारात आपले वजन वाजवीपेक्षा जास्त आहे. दारु अथवा तंबाखूचे नेहमी सेवन, कुटुंबामध्ये कोणालाही मधुमेह आणि उच्च रक्तदाब, स्तनांचा कर्करोग, स्तनामध्ये गाठ, निप्पल मध्ये पु किंवा रक्तस्राव किंवा स्तनाच्या आकारात बदल, गर्भाशय मुख कर्करोग, अंगावरून पांढरे रंगाचा स्राव व दुगंर्धी, मासिक पाळी व्यतिरिक्त योनीमधून रक्तस्त्राव, मासिक पाळी चक्रबंद झाल्यानंतर रक्तस्राव व शारीरिक संबंधांनंतर रक्तस्राव तसेच तोंडाचे कर्करोग दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी तोंड येणे, तोंडामध्ये लाल किंवा पांढरा चट्टा असणे. तोंडामध्ये गाठ किंवा जखम किंवा तोंड उघडताना त्रास होणे इत्यादी लक्षणे आढळून येतात, अशी माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, सहाय्यक संचालक संदीप गेडाम, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी प्रकाश साठे, उमेद अभियानाचे समन्वयक राहुल ठाकरे उपस्थित होते.

 

 


Web Title: Will conduct a survey of 2 lakh 3 thousand families
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.