स्वतःला स्वयंघोषित पंतप्रधान म्हणवून घेणारा, कोण आहे ती व्यक्ती? प्रशासनाकडे केली अजब मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 20:05 IST2026-02-26T20:05:21+5:302026-02-26T20:05:53+5:30

Chandrapur : वरोरा येथील एका नागरिकाने स्वतःला 'भारताचा स्वयंघोषित पंतप्रधान' संबोधत थेट पोलिस आयुक्तांना अर्ज सादर केल्याची अफलातून घटना समोर आली आहे.

Who is the person who calls himself the self-proclaimed Prime Minister? Strange demand made to the administration | स्वतःला स्वयंघोषित पंतप्रधान म्हणवून घेणारा, कोण आहे ती व्यक्ती? प्रशासनाकडे केली अजब मागणी

Who is the person who calls himself the self-proclaimed Prime Minister? Strange demand made to the administration

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
वरोरा येथील एका नागरिकाने स्वतःला 'भारताचा स्वयंघोषित पंतप्रधान' संबोधत थेट पोलिस आयुक्तांना अर्ज सादर केल्याची अफलातून घटना समोर आली आहे. महादेव गुलाबराव आसेकर असे अर्जदाराचे नाव असून, त्यांनी पंतप्रधान पदावर नियुक्ती झाल्याचा दावा करत अंगरक्षणासाठी पिस्टल व प्रमाणपत्र घरपोहोच देण्याची मागणी केली आहे.

आसेकर यांनी दिलेल्या अर्जात, 'मी स्वयंइच्छेने भारताच्या पंतप्रधानपदावर नियुक्त झालो आहे. त्यामुळे पंतप्रधानांना मिळणारे प्रमाणपत्र तसेच अंगरक्षणासाठी पिस्टल तत्काळ देण्यात यावे,' अशी मागणी नमूद केली आहे. यापूर्वी पोलिस स्टेशन वरोरा येथे अर्ज दिला; मात्र वरिष्ठ अधिकारी मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

अर्जात पुढे वरोरा येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कर्तव्यात हयगय केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित पदावर वर्षा तंदूलकर यांची 'पोलिस निरीक्षक (ठाणेदार)' म्हणून नियुक्ती करावी, अशीही आगळीवेगळी मागणी अर्जदाराने केली आहे.

या विलक्षण अर्जाची चर्चा वरोरा शहरात रंगली असून, नागरिकांमध्ये कुतूहल व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिसांकडून अर्जाची नोंद घेण्यात आल्याची माहिती असून प्रकरणाकडे विनोदी नजरेतून पाहिले जात आहे. अधिकृत पातळीवर मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

कोण आहे ही व्यक्ती?

महादेव आसेकर यांना शेतीतून पाच कोटी मिळाल्याचे समजते. यानंतर त्यांनी वरोरा येथे आलिशान घर खरेदी केले. तसेच फार्च्यूनर कार घेतली. पूर्वी तो 'मी कॅबिनेट दर्जा माणूस असल्या'चे सांगत होता. नंतर काही दिवस कारवर 'व्हीआयपी पर्सन' असे लिहिले होते. आता तर चक्क स्वतःला स्वयंघोषित पंतप्रधान म्हणून मिरवत आहे. तो सोशल मीडियावरही या बाबी व्हायरल करतो. वरोरा येथे तो खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या निवासस्थानाच्या परिसरात राहत असून, त्यांच्या घरासमोरून कार रेस करून पुढे नेतो, अशी माहिती मिळाली.

Web Title : स्वयंघोषित प्रधानमंत्री: व्यक्ति ने पिस्टल मांगी, मचा हाहाकार

Web Summary : वरोरा में एक व्यक्ति ने खुद को भारत का प्रधानमंत्री घोषित करते हुए पुलिस आयुक्त से पिस्टल और प्रमाणपत्र की मांग की। उनकी अजीब मांग और पृष्ठभूमि ने स्थानीय लोगों में जिज्ञासा पैदा कर दी है, हालांकि पुलिस इसे हास्यप्रद मान रही है।

Web Title : Man Declares Himself Prime Minister, Demands Pistol, Sparks Curiosity

Web Summary : A man in Warora, claiming to be India's self-declared Prime Minister, submitted an application to the police commissioner demanding a pistol and official certificate. His unusual request and background have stirred local curiosity, though police treat it humorously.