शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सिंदेवाहीत कृषी विद्यापीठ केव्हा होणार स्थापन ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 14:59 IST

पूर्व विदर्भाची उपेक्षा : सिंदेवाहीत नव्या कृषी विद्यापीठाचा होता प्रस्ताव

संदीप बांगडेलोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : विदर्भातील एकमेव अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विभाजन करून पूर्व विदर्भात स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी मध्यंतरी मोठ्या हालचाली सुरू होत्या. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे कृषी संशोधन केंद्र, विज्ञान केंद्र असल्यामुळे येथे नवे कृषी विद्यापीठ स्थापन केले जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यादृष्टीने प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे. तसेच तालुका विकास संघर्ष समिती, व्यापारी असोसिएशनकडून निवेदनाद्वारे यासाठी प्रयत्नही झाले. मात्र, सदर प्रस्ताव आता थंडबस्त्यात पडला आहे. याबाबत कोणत्याही हालचाली केल्या नसल्याने पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांचे उपेक्षा होत आहे.

विदर्भात अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संपूर्ण विदर्भात एकमेव कृषी विद्यापीठ आहे. या भागात धान हे प्रमुख पीक असल्याने त्यावरील संशोधन कार्य अनेकदा उपेक्षित राहते, यांची खंत या भागातील कृषीतज्ज्ञ, राजकीय नेते, शेतकरी यांना कायम राहिली आहे. त्यामुळे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विभाजन करून सिंदेवाहीत कृषी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी पूर्व विदर्भातील १२ जिल्ह्यांना यामुळे कृषी संशोधन कामासाठी न्याय मिळेल, अशीही भूमिका विद्यापीठ स्थापनेच्या समर्थनार्थ मांडण्यात आली होती. 

सरकारच्या दालनात अडकले कृषी विद्यापीठसिंदेवाहीत कृषी विद्यापीठ झालेच पाहिजे, यासाठी तालुका संघर्ष समिती, व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून नेहमीच जिल्हाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री महोदयांना निवेदनासह पत्रव्यवहार करण्यात आले होते. परंतु अजूनही सरकारच्या दालनातच हे कृषी विद्यापीठ अडकून आहे.

माशी कुठे शिंकली ?विद्यापीठांतर्गत सिंदेवाही कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र आहेत. हे लक्षात घेऊन सिंदेवाही कृषी विद्यापीठ निर्मितीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. यादृष्टीने प्रस्ताव सादर केल्याची चर्चाही आहे. मात्र, त्यानंतर माशी कुठे शिंकली, माहीत नाही.

वडेट्टीवार सिंदेवाही तर मुनगंटीवार मूलसाठी होते आग्रहीदिवंगत आर आर. पाटील गडचिरोलीचे पालकमंत्री असताना निधी उपलब्ध करून गडचिरोली येथे कृषी महाविद्यालयाची इमारत उभी केली. त्यामुळे या भागात अनेक खासगी कृषी महाविद्यालये दुर्गम परिसरात निर्माण झाली. या भागात रोजगार निर्मितीचे शेती हे मोठे साधन होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून शेतीसाठी कुशल मनुष्यबळ, नवे तंत्रज्ञान निर्माण करणे या दोन्ही बाबी लक्षात घेऊन नवीन विद्यापीठ स्थापन करण्यात येणार होते. या क्षेत्राचा विकास होईल, या दृष्टीने माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पाठिंबा दर्शविला होता. सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ स्थापन होईल, अशी त्यांची आग्रही भूमिका होती. तर आमदार सुधीर मुनगंटीवार मूल येथे विद्यापीठ स्थापन व्हावे, यासाठी आग्रही होते.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरEducationशिक्षण