शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

वऱ्हाडी नसलेला असाही एक लग्नसोहळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 6:00 AM

लग्नपत्रिकाही छापल्या. त्या आप्तेष्ट नातेवाईक व संबधित व्यक्तींना वाटण्यातही आल्या. घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू झाली. वरात नेण्यासाठी वाहनही बुक झाले. बॅन्ड पथकही ठरविले. घोडीही ठरविण्यात आली. घरात सर्व आनंदाचे वातावरण होते. परंतु त्यांच्या आनंदावर विरजण पडले एका मंदिरात फक्त वधूचे आईवडील मामा व वराचे आईवडील आणि मामा यांच्या उपस्थित हा लग्न सोहळा पार पडला.

ठळक मुद्देसंडे अ‍ँकर। समाजापुढे आदर्श, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याचा प्रयत्न

अमोद गौरकार ।लोकमत न्यूज नेटवर्कशंकरपूर : ना सनई-चौघडे...ना बॅन्ड बाजा पथक..ना भटजी...ना वऱ्हाडी..ना जेवनावडी.. नाही मानपान.. नाही कोणताच थाटमाट. अगदी साध्या पद्धतीने विवाह करून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याचा प्रयत्न दोन कुटुंबीयांनी करीत समाजापुढे आदर्श ठेवला आहे.मागील काही दिवसांपासून कोरोनाने देशभरातच थैमान घातले आहे. त्यामुळे प्रशासनाने लोकांना एकत्रित जमा होऊ नका, एकमेकांच्या संपर्कात येऊ नका, शक्य होत असेल तर लग्न कार्य पुढे ढकला, असे आवाहन केले आहे. त्या आवाहनाला प्रतिसादही मिळत आहे. प्रशासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी शंकरपूर येथील हिंगे परिवार पुढे आला. शंकर हिंगे यांच्या मुलगा आकाश याचे लग्न डिसेंबर महिन्यात जुळले. तेव्हाच साक्षगंध आटोपून १९ मार्च तारीखही काढली. लग्नपत्रिकाही छापल्या. त्या आप्तेष्ट नातेवाईक व संबधित व्यक्तींना वाटण्यातही आल्या. घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू झाली. वरात नेण्यासाठी वाहनही बुक झाले. बॅन्ड पथकही ठरविले. घोडीही ठरविण्यात आली. घरात सर्व आनंदाचे वातावरण होते. परंतु त्यांच्या आनंदावर विरजण पडले. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडयापासूनच कोरोना या विषाणूजन्य रोगाने महाराष्ट्रात पाय पसरलाय सुरुवात केली. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून जनतेला आवाहन केल.े त्यामुळे लग्न करायचे की नाही, की पुढे ढकलायचे असा गंभीर प्रश्न हिंगे परिवाराला पडला. अखेर त्यांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत फक्त वर-वधु आणि आईवडील एवढेच जण एकत्र येत लग्न सोहळा उरकविण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय वधू पक्षांकडील हिरुडकर परिवाराला कळविण्यात आला.त्यांनीसुद्धा या निर्णयाला समर्थन दिले आणि एका मंदिरात फक्त वधूचे आईवडील मामा व वराचे आईवडील आणि मामा यांच्या उपस्थित हा लग्न सोहळा पार पडला. शनिवारी होणारे स्वागत समारंभही रद्द करण्यात आले. या निर्णयामुळे लग्न समारंभाच्या आनंदावर विरजण जरी पडले असेल तरीपण लोकांच्या आरोग्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचे जनमाणसात स्वागत केले जात आहे.

टॅग्स :marriageलग्नCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस