शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

आझाद गार्डन भकास होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:24 IST

विविध उद्योग व वाढत्या वाहनांमुळे धूळ आणि प्रदूषित हवा हे चंद्रपूर शहराचे आजचे वास्तव आहे. शहरात सिमेंटचे जंगल झपाट्याने वाढू लागले. तितकेच प्रदूषणही वाढत आहे. शहर विकासाचे नियोजन करताना निसर्गाशी असलेला माणसासोबतचा संबंध कायम दुर्लक्षित केला जात आहे.

ठळक मुद्देसोयीसुविधांचा अभाव : मौलाना आझाद गार्डनच्या विकासात राजकारणाचा शिरकाव नको

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विविध उद्योग व वाढत्या वाहनांमुळे धूळ आणि प्रदूषित हवा हे चंद्रपूर शहराचे आजचे वास्तव आहे. शहरात सिमेंटचे जंगल झपाट्याने वाढू लागले. तितकेच प्रदूषणही वाढत आहे. शहर विकासाचे नियोजन करताना निसर्गाशी असलेला माणसासोबतचा संबंध कायम दुर्लक्षित केला जात आहे. यातून निसर्गाचा समतोल ढासळला. मानवी जीवनावर दुष्परिणाम होत आहेत, असा आरोग्य विभागाचा अहवाल सांगतो. त्यामुळे आझाद गार्डनच्या विकासासाठी कालबद्ध नियोजनाची आज गरज आहे.शहरातील नागरिकांच्या श्वासांना प्राणवायू देणारी एक विलक्षण जागा म्हणून मौलाना अबुल कलाम आझाद गार्डनची ओळख बच्चे कंपनीपासून तर ज्येष्ठांपर्यंत आहे. खरे तर ही काही करमणुकीची जागा नाही. पण, विकासाच्या दीर्घकालीन नियोजनाचा अभाव आणि स्थानिक प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा बगीचा आता भकास होण्याचा मार्गावर आहे, अशी खंत नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. मौलाना अबुल कलाम आझाद गार्डनेचे संवर्धन करणे, ही मनपा प्रशासन व आपल्या जगण्याची एक नितांत गरज आहे. याचा सांभाळ केला नाही तर भविष्यात मोठी संकटे येतील. सिमेंटच्या जंगलात हीच एक हक्काची जागा आहे, अशी भावना दररोज सकाळी योगसनासाठी येणाऱ्या महिलांनी बोलून दाखविली. शहराच्या वाढत्या सिमेंटीकरणात माणसांची प्रकृती सुदृढ ठेवण्याचे दायित्व मनपा प्रशासनाला टाळता येणार नाही. गार्डनच्या विकासासाठी नगरसेवकांनी राजकारण करूनये, अशी अपेक्षा अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाºया श्रीकांत येवले या विद्यार्थ्याने व्यक्त केली.- तर बालके शहरातच निसर्ग अनुभवतीलमोबाईल टिव्हीसारख्या विविध साधनांमुळे मुलांचे बालपण करपू लागले. पालकांशी संवाद तुटू लागला. अशा अस्वस्थ कालखंडात शहराच्या मध्यभागी असलेले आझाद गार्डन मुलांच्या निसर्ग शिक्षणासाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र, गार्डनला नैसर्गिक स्वरूप देण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे. यातून मुले निसर्गप्रेमी होतील. निरीक्षणशक्ती वाढेल. शहराचा भूगोल व इतिहासातून मुलांची मने समृद्ध होतील. मुलांना बदलत्या काळाशी सुसंगत ठेवताना आपल्या परिसराशी नाळ कायम राहील. निसर्गाबाबत आस्था निर्माण झाल्यास त्यांच्यात सामाजिक जाणिवा वाढतील. मनपाने याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना निवृत्त जिल्हा कोषाधिकारी प्रल्हाद कोल्हटकर यांनी केली.