आझाद गार्डन भकास होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:23 AM2019-05-18T00:23:39+5:302019-05-18T00:24:17+5:30

विविध उद्योग व वाढत्या वाहनांमुळे धूळ आणि प्रदूषित हवा हे चंद्रपूर शहराचे आजचे वास्तव आहे. शहरात सिमेंटचे जंगल झपाट्याने वाढू लागले. तितकेच प्रदूषणही वाढत आहे. शहर विकासाचे नियोजन करताना निसर्गाशी असलेला माणसासोबतचा संबंध कायम दुर्लक्षित केला जात आहे.

On the way to the Azad Garden Barking | आझाद गार्डन भकास होण्याच्या मार्गावर

आझाद गार्डन भकास होण्याच्या मार्गावर

googlenewsNext
ठळक मुद्देसोयीसुविधांचा अभाव : मौलाना आझाद गार्डनच्या विकासात राजकारणाचा शिरकाव नको

राजेश मडावी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : विविध उद्योग व वाढत्या वाहनांमुळे धूळ आणि प्रदूषित हवा हे चंद्रपूर शहराचे आजचे वास्तव आहे. शहरात सिमेंटचे जंगल झपाट्याने वाढू लागले. तितकेच प्रदूषणही वाढत आहे. शहर विकासाचे नियोजन करताना निसर्गाशी असलेला माणसासोबतचा संबंध कायम दुर्लक्षित केला जात आहे. यातून निसर्गाचा समतोल ढासळला. मानवी जीवनावर दुष्परिणाम होत आहेत, असा आरोग्य विभागाचा अहवाल सांगतो. त्यामुळे आझाद गार्डनच्या विकासासाठी कालबद्ध नियोजनाची आज गरज आहे.
शहरातील नागरिकांच्या श्वासांना प्राणवायू देणारी एक विलक्षण जागा म्हणून मौलाना अबुल कलाम आझाद गार्डनची ओळख बच्चे कंपनीपासून तर ज्येष्ठांपर्यंत आहे. खरे तर ही काही करमणुकीची जागा नाही. पण, विकासाच्या दीर्घकालीन नियोजनाचा अभाव आणि स्थानिक प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा बगीचा आता भकास होण्याचा मार्गावर आहे, अशी खंत नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. मौलाना अबुल कलाम आझाद गार्डनेचे संवर्धन करणे, ही मनपा प्रशासन व आपल्या जगण्याची एक नितांत गरज आहे. याचा सांभाळ केला नाही तर भविष्यात मोठी संकटे येतील. सिमेंटच्या जंगलात हीच एक हक्काची जागा आहे, अशी भावना दररोज सकाळी योगसनासाठी येणाऱ्या महिलांनी बोलून दाखविली. शहराच्या वाढत्या सिमेंटीकरणात माणसांची प्रकृती सुदृढ ठेवण्याचे दायित्व मनपा प्रशासनाला टाळता येणार नाही. गार्डनच्या विकासासाठी नगरसेवकांनी राजकारण करूनये, अशी अपेक्षा अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाºया श्रीकांत येवले या विद्यार्थ्याने व्यक्त केली.
- तर बालके शहरातच निसर्ग अनुभवतील
मोबाईल टिव्हीसारख्या विविध साधनांमुळे मुलांचे बालपण करपू लागले. पालकांशी संवाद तुटू लागला. अशा अस्वस्थ कालखंडात शहराच्या मध्यभागी असलेले आझाद गार्डन मुलांच्या निसर्ग शिक्षणासाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र, गार्डनला नैसर्गिक स्वरूप देण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे. यातून मुले निसर्गप्रेमी होतील. निरीक्षणशक्ती वाढेल. शहराचा भूगोल व इतिहासातून मुलांची मने समृद्ध होतील. मुलांना बदलत्या काळाशी सुसंगत ठेवताना आपल्या परिसराशी नाळ कायम राहील. निसर्गाबाबत आस्था निर्माण झाल्यास त्यांच्यात सामाजिक जाणिवा वाढतील. मनपाने याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना निवृत्त जिल्हा कोषाधिकारी प्रल्हाद कोल्हटकर यांनी केली.

Web Title: On the way to the Azad Garden Barking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.