शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

जलजीवन मिशन देणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 06:00 IST

ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी नळ योजना राबवल्या जातात. अनेकदा निधीअभावी या योजना अपूर्णच राहतात. त्याचबरोबर बऱ्याचदा पाणी पुरवठयाचे स्रोत आठतात. उन्हाळ्यात गावाची तहाण भागवण्यासाठी टँकर सुरू करावा लागतो. गतवर्षी जिल्ह्यात अनेक गावांना टँकरने पाणी पुरवावे लागले होते.

ठळक मुद्देग्रामीण भागातील पाण्याची पायपीट थांबणार : प्रत्येक नमुना ८ च्या नोंदीला नळ कनेक्शन

रवी जवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्वच्छता अभियानाप्रमाणेच आता ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे मिशन शासनाने हाती घेतले आहे. त्यासाठी जलजीवन मिशन योजना राबवण्यात येणार असून पाणीपुरवठयासाठी प्रत्येक गावाच्या कृती आराखडयासह जिल्ह्याचाही कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश शासनाने जिल्हा परिषदेला दिले आहेत.ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी नळ योजना राबवल्या जातात. अनेकदा निधीअभावी या योजना अपूर्णच राहतात. त्याचबरोबर बऱ्याचदा पाणी पुरवठयाचे स्रोत आठतात. उन्हाळ्यात गावाची तहाण भागवण्यासाठी टँकर सुरू करावा लागतो. गतवर्षी जिल्ह्यात अनेक गावांना टँकरने पाणी पुरवावे लागले होते. त्यामुळे गावकऱ्यांच्या सहकार्याने ग्रामसेवक, सरपंच यांनी कृती आराखडा तयार करायचा आहे. २६ जानेवारीच्या सभेत या आराखडयावर चर्चा करण्यात आली आहे. गावातील नमुना नंबर ८ वरील प्रत्येक घराला नळ जोडणी दिली जाणार आहे. याशिवाय ज्या गावांमध्ये नळ योजना असतील, पण या योजना अपुºया पडत असतील, अशा गावांमध्ये मुबलक पाणी पुरवठयासाठी सुधारित कृती आराखडा तयार करावा लागेल.जुन्या योजना तयार करताना प्रति माणसी ४० लिटर पाणी पुरवठयाचे नियोजन केले जाते. आता प्रति माणसी ५५ लिटर पाणी देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने हा आराखडा तयार करावा लागणार आहे. तसेच हा आराखडा तयार करताना गावातील जनावरांची संख्या, त्यांना लागणारे पाणी आदींचाही विचार करावा लागणार आहे.गावच्या कृती आराखडयाबरोबरच जिल्ह्याचाही कृती आराखडा तयार करावा लागणार आहे. तसे निर्देश जिल्हा परिषदांना शासनाने दिले आहेत. या आराखडयामध्ये सन २०२४ पर्यंत प्रत्येक कुटुंबास वैयक्तिक, घरगुती नळ जोडणीद्वारे पेयजल सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने धोरणात्मक आराखडा व त्यासोबतचा त्रैमासिक, वार्षिक आराखडा तयार करणे, भूजलावर आधारित पाणी पुरवठा योजना करावयाची गावे निश्चित करणे, जिल्हांतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या विविध उपांगांचे नमुना अंदाज पत्रक तयार करणे आदींचा समावेश आहे. या योजनेचा आता नागरिकांनी लाभ घेण्याची गरज आहे.नवीन पाणीपुरवठा योजनांचा कालावधी निश्चितस्वतंत्र पाणीपुरवठा योजनांसाठी १८ महिने व प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांसाठी ३६ महिन्यांचा जास्तीत जास्त कालावधी राहणार आहे. ज्या पाणी पुरवठा योजनांना तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे, अशा योजनांना मार्च २०२१ पूर्वी कायार्देश देणे आवश्यक आहे. ज्या योजनांना मार्च २०२१ पूर्वी कायार्देश देणे शक्य नाही, अशा योजनांचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवणे आवश्यक आहे.५० लोकांच्या वाडीचाही होणार विचारगावातील नमुना नंबर ८ वरील प्रत्येक घराला नळ जोडणी दिली जाणार आहे. याशिवाय किमान ५० लोकांच्या वाडीवस्तीवरील घरांचाही विचार कृती आराखडयात करावा लागणार आहे. त्या लोकांना पाणी कसे द्यायचे, गावालगतचा पाण्याचा स्रोत कोणता, पाईपलाईन कुठून व कशी आणता येईल, या मुद्यांवर विचार केला जाणार आहे.

टॅग्स :Waterपाणी