शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजना चार महिन्यांपासून बंद

By admin | Updated: April 13, 2016 01:20 IST

येथील अमराई वॉर्डाला पाणीपुरवठा करणाऱ्या ट्युबवेलच्या दुरुस्तीदरम्यान मोटारसह पाईप ट्युबवेलमध्ये पडले.

घुग्घुस : येथील अमराई वॉर्डाला पाणीपुरवठा करणाऱ्या ट्युबवेलच्या दुरुस्तीदरम्यान मोटारसह पाईप ट्युबवेलमध्ये पडले. तेव्हापासून या योजनेमार्फत अमराई वॉर्डाला होणारा पाणीपुरवठा गेल्या चार महिन्यांपासून बंद आहे. ग्रामपंचायतीने टूबवेल दुरुस्ती बाबत तत्काळ निर्णय घेण्याची गरज होती. मात्र चार महिने लोटूनही दुरुस्ती करण्यात न आल्याने वॉर्डात पाणीटंचाई निर्माण झाली असून महिलांची पायपीट सुरू आहे. घुग्घुस ग्रामपंचायतची पाच लक्ष लिटर क्षमतेची बसस्थानक परिसरात पाणी टाकी आहे. वेकोलिच्या चुकीच्या धोरणामुळे घुग्घुस कॉलरी क्र. २ व घुग्घुस वस्तीच्या मध्ये असलेली पाणी पुरवठा योजना कोळसा खाणीत होणाऱ्या ब्लॉस्टिंगमुळे जीर्ण झाली. वर्धा नदीवरुन पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन तुटणे, जोडण्याची डोकेदुखी ठरत असल्याने त्या योजनेच्या टाकीचे काही अंतरावर पुनर्वसन करण्यात आले. पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले. मात्र नदीवरुन पाईपलाईन टाकण्याची वेकोलिने हरकत घेतल्यामुळे बरेच दिवस पाईपलाईनचे काम रेंगाळत राहिले. बोअरवेल लावून पाणीपुरवठा करण्याची योजना आखली, पण टाकीत पाणी चढत नव्हते. म्हणून खाली टॅक बनवून मोटार पंंपने पाणी पोहोचविण्याचे काम केले. पण त्यालाही यश आले नाही. त्यामुळे ट्युबवेल खोदण्यात आले. त्यानंतर कशीबशी योजना कार्यान्वित होऊन सुरळीत अमराई वॉर्डाला पाणीपुरवठा सुरू झाला. पूर्वीच गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना चार दिवसांनी वार्डाला होणारा पाणी पुरवठा पाच दिवसांनी होत आहे. पाणी टंचाई असताना बंद ट्युबवेल दुरुस्तीकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत आहे. नवीन मोटार पंप व पाईप खरेदीला ठराव घेतला असता तरी ग्राम पंचायतीच्या चुकीच्या कामाचा एक दीड लाखांचा फटका बसणार आहे. पाण्याच्या विषय गंभीर होत असला तरी ग्राम पंचायत पदाधिकारी मात्र गंभीरते घेत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)