शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
3
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
4
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
5
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
6
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
7
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
8
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
9
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
10
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
11
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
12
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
13
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
14
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
15
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
16
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
17
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
18
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
19
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
20
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मूल तालुक्यातील अनेक गावांत पाणी टंचाई

By admin | Updated: June 5, 2014 23:54 IST

मूल तालुक्यात ४८ ग्रामपंचायती असून ११0 गावांचा समावेश आहे. तालुक्यातील जवळपास २५ गावांमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन पंचायत समितीस्तरावरुन २५.0५ लाख रुपयांचा

राजू गेडाम - मूलमूल तालुक्यात ४८ ग्रामपंचायती असून ११0 गावांचा समावेश आहे. तालुक्यातील जवळपास २५ गावांमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन पंचायत समितीस्तरावरुन २५.0५ लाख रुपयांचा आराखडा शासनस्तरावर मंजुरीसाठी मागविण्यात आला. मात्र प्रशासनाने एकही प्रस्ताव मंजूर न केल्याने जून महिन्यात पाण्याची भीषण टंचाई जाणवायला लागली आहे. २५ लाखांपैकी अर्धा निधी मंजूर झाला असता, तर काही गावांतील प्रस्ताव मंजूर झाले असते तर त्या गावांना दिलासा मिळाला असता. मात्र एकही प्रस्ताव मंजूर न झाल्याने प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मूल तालुक्यातील भादुर्णी, काटवन, कोसंबी, ताडाळा, नलेश्‍वर, बाबराळा, नांदगाव, चिरोली, सुशी, टेकाडी, भवराळा, चिमढा, चांदापूर, पिपरी दीक्षित, चिखली, बोंडाळा बुज, नवेगाव भु., फिस्कुटी, केळझर, राजोली या २0 गावांत ३४ ठिकाणी विहिरी खोल करणे, गाळ उपसणे व इनवेल बोअर करणे यासाठी ४.८0 लाख रुपयाचा प्रस्ताव पाणी टंचाई आराखड्यात सादर करण्यात आला. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करून पाणी समस्येची टर उडविली. नळयोजना दुरुस्तीसाठी मूल तालुक्यातील राजोली, चिरोली, चकघोसरी, जुनासूर्ला, राजगड, बोरचांदली या सहा गावात २१ लाख रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला. याकडेसुद्धा प्रशासनाने डोळेझाक केल्याचे दिसून येते. नवीन हातपंपासाठी तालुक्यातील जुनासुर्ला, काटवन, आकापूर, मानकापूर, चकघोसरी या पाच गावात पाच लाख रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला. याकडे सुद्धा डोळेझाक करण्यात आली. हातपंप दुरुस्तीसाठी मारोडा, आकापूर, चांदापूर, नवेगाव भूजला, गडीसूर्ला, सिंतळा, ताडभूज, येरगाव या आठ गावात नऊ कामे प्रस्तावित आली. ४.२५ लाख रुपयाच्या किंमतीच्या कामांना मंजुरी देण्यात आली नाही. मात्र मूल पंचायत समितीने स्वत: पुढाकर घेऊन सदर आठ गावांत हातपंपाची दुरुस्त केली. मात्र इतर गावांत ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत येत असल्याने ती शासनस्तरावरुन मंजूर होणे गरजेचे होते.सन २0१३-१४ या वर्षात पाणी टंचाई आराखडा सादर करण्यात आला. त्यातील निधी मंजूर झाला असता तर भविष्यात सन २0१४-१५ या वर्षात पाणी टंचाईवर मात करता आली असती. पाण्याची पातळी मे व जून महिन्यात खालावली. परिणामी लांब अंतरावर पाणी आणावे लागते. विहिरीचे खोलीकरण, गाळ उपसणे व इनवेल बोअर झाले असते तर ऐन मे व जून महिन्यात गावकर्‍यांना पायपीट करावी लागली नसती. प्रशासनाकडून ही बाब गंभीरतेने न घेता केवळ कागदी घोडेच नाचविण्याचे काम केले जात आहे.