शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

१६१ पाण्याचे नमुने फ्लोराईड बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्हा व उपविभागीय पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेत डिसेंबर २०१९ मध्ये तपासणी करण्यात आलेल्या एकूण ...

ठळक मुद्देपृथकरणाचा अहवाल : प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा व उपविभागीय पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेत डिसेंबर २०१९ मध्ये तपासणी करण्यात आलेल्या एकूण २४६१ पाणी नमुन्यांपैकी १६१ पाणी नमुने फ्लोराईड बाधित आढळले आहे.भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा चंद्रपूर आणि जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा चंद्रपूर अंतर्गत जिल्ह्यातील गावांमधील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याकरिता उपलब्ध स्त्रोतांचे पाणी नमुने तपासणी करीत असतात. यामध्ये पाण्यातील फ्लोराईडचे व दूषित पाण्याचे प्रमाण तपासणी केल्या जाते.चंद्रपूर तालुक्यातील ३३१ तपासलेल्या पाणी नमुन्यांपैकी २१ फ्लोराईड बाधित नमुने आढळले आहे. बल्लारपूरमध्ये ७२ तपासलेल्या नमुन्यांपैकी दोन फ्लोराईड बाधित नमुने, राजुरा तालुक्यातील ९२ तपासलेल्या नमुन्यांपैकी एक नमुना फ्लोराईड बाधित, कोरपनामधील २०१ नमुन्यांपैकी दहा, भद्रावती तालुक्यामध्ये १९१ तपासलेल्या नमुन्यांपैकी चार नमुने फ्लोराईड बाधित आहेत. ब्रह्मपुरीमध्ये ७५ तपासलेल्या नमुन्यांपैकी सर्वच पाणी नमुने पिण्यायोग्य आहेत, नागभीड तालुक्यामध्ये १३५ तपासलेल्या पाणी नमुन्या पैकी सर्वच पाणी नमुने पिण्यायोग्य आहेत, गोंडपिंपरीमध्ये ५० पाणी नमुन्यांपैकी सर्वच पाणी पिण्यायोग्य तर पोंभुर्णा तालुक्यामधील २६२ तपासलेल्या नमुन्यांपैकी सर्वच पाणी पिण्यायोग्य आढळून आले आहे.वरोरा मध्ये ११३ पाणी नमुने तपासल्यानंतर १५ पाणी नमुने फ्लोराईड बाधित, चिमूर तालुक्यामध्ये ३५८ तपासलेल्या नमुन्यांपैकी ६३ नमुने फ्लोराईड बाधित, सावलीमध्ये १९९ तपासलेल्या पाणी नमुन्यांपैकी २२ पाणी नमुने फ्लोराईड बाधित, मूल तालुक्यातील १४४ पाणी नमुने तपासल्यानंतर २४ पाणी नमुने फ्लोराईड बाधित आढळले आहे, तर सिंदेवाही तालुक्यामध्ये २३८ तपासलेल्या पाणी नमुन्यांपैकी सर्वच नमुने पाणी पिण्यायोग्य आढळून आले आहे.जिल्ह्यातील एकूण २४६१ तपासलेल्या नमुन्यांपैकी १६२ फ्लोराईड बाधित तर जिल्ह्यातील दूषित नमुन्यांची टक्केवारी ६.५८ आहे.जि.प.च्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडून या फ्लोराईड बाधित स्त्रोतांबाबत कार्यवाही सुरू आहे.

टॅग्स :Waterपाणी