शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

अवघ्या १५ हजारांत चार गावांत जलक्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 06:00 IST

भद्रावती तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कोळसा खाणींमुळे 'ड्राय झोन' तयार झाले आहे. पळसगाव व विसलोनसारख्या गावांमध्ये एक हजार फुटांपर्यंत बोअरवेल खोदले तरी पाणी लागत नाही. परिणामी, पाणीटंचाईची झळ सहन करावी लागते. गावापासून नदी वाहात असतानाही पाणीटंचाईची ही स्थिती उद्भवत असल्याने गावकरी चिंतेत सापडले होते.

ठळक मुद्देलोकसहभागाची फलश्रुती : शेतकऱ्यांना मिळते मुबलक पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत कोट्यवधी खर्च केल्यानंतरही अनेक ठिकाणी पाणी साठवता आलो नाही. परंतु, लोकसहभागातून गावकऱ्यांनी अवघ्या १५ हजारात भद्रावती तालुक्यातील चार गावांमध्ये जलक्रांती घडवून आणण्याची किमया करून दाखवली. शिरना नदीवर १५ फुट मातीचा बंधारा बांधल्यामुळे चार किलोमीटर परिसरात मुलबल पाणी उपलब्ध झाले. पळसगाव, विसलोन, कुचना व नागलोन येथील गावकऱ्यांप्रमाणे इच्छाशक्ती दाखविल्यास असे प्रयोग जिल्हाभरात यशस्वी होऊ शकतात.भद्रावती तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कोळसा खाणींमुळे 'ड्राय झोन' तयार झाले आहे. पळसगाव व विसलोनसारख्या गावांमध्ये एक हजार फुटांपर्यंत बोअरवेल खोदले तरी पाणी लागत नाही. परिणामी, पाणीटंचाईची झळ सहन करावी लागते. गावापासून नदी वाहात असतानाही पाणीटंचाईची ही स्थिती उद्भवत असल्याने गावकरी चिंतेत सापडले होते. मात्र, यावर्षी लोकसहभागातून एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. पळसगाव, विसलोन, कुचना आणि नागलोन या कोळशाने व्याप्त गावांमध्ये जलक्रांती घडवून आणल्याची अनुभूती आली आहे. या गावांमधील शेतकरी अवघ्या १५ हजार रुपये व श्रमदानामुळे दुबार पेरणीसाठी उपयुक्त ठरले आहे. नंदोरीपासून विसलोन, पळसगाव, माजरी व नंतर वर्धा नदीला मिळणारी शिरना नदी पावसाळ्यात प्रवाहित असते.खरीप व रब्बी हंगामात या नदीला पाणी राहत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडतात. मात्र, यावर्षी केवळ १५ हजार रूपये खर्च करून काही दिवसांपूर्वी शिरना नदीत मातीचा १५ ते २० फूट आडवा बंधारा टाकण्यात आला. या बंधाऱ्यामुळे नदीपात्रात जनावरांनाही पिण्यासाठी पाणी राहात नसताना आता चार किलोमीटरपर्यंत पाणी साठविले आहे. पळसगाव येथे किसानपूत्र गटशेती योजनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र्र जीवतोडे यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग करण्यात आला असून चारही गावे जलयुक्त झाली आहे. या प्रयोगासाठी संदीप झाडे, प्रकाश निब्रड, परशराम डाहुले यांच्यासह गावकरी पुढे सरसावल्याने तिनही गावांतील जलसंकट कायमचे दूर झाले आहे.जिल्ह्यातील पहिला प्रयोगशेतकरी व गावकऱ्यांना सोबत घेऊन जलसिंचनाचे प्रयोग केल्यास समस्या दूर होऊ शकता. त्यासाठी लोकसहभाचे तत्त्व महत्त्वाचे आहे. पळसगाव, विसलोन, कुचना व नागलोन येथील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून बांधलेला हा बंधारा शासनाच्या योजनेसाठी पथदर्शी ठरू शकतो. त्यामुळे असे शाश्वत सिंचनाचे प्रयोग जिल्ह्यात राबविण्याची गरज आहे.चंद्र्रपूर जिल्हा कोळशाने व्याप्त असल्यामुळे पाण्याची पातळी खालावत आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. वेकोलिच्या सीएसआर फंडातून लहान व मोठ्या नद्यांवरही बंधारे बांधणे गरजेचे आहे. पळसगाव व परिसरात आम्ही राबविलेला प्रयोग प्रत्येक गावात झाला तर जिल्ह्यात जलक्रांती होऊ शकते.- नरेंद्र्र जीवतोडे,जिल्हाध्यक्ष, किसानपूत्रशेतकरी गटशेती योजना

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प