पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 23:51 IST2018-12-09T23:49:59+5:302018-12-09T23:51:04+5:30
दिवसेंदिवस पाण्याच्याा पातळीत घट होत आहे. निती आयोगाच्या अहवालानुसार २०३० पर्यंत भारतातील २१ प्रमुख शहरातील पाणीसाठे संपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यापुढील काळात पाणी टंचाईत आणखी भर पडणार आहे.

पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन काळाची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : दिवसेंदिवस पाण्याच्याा पातळीत घट होत आहे. निती आयोगाच्या अहवालानुसार २०३० पर्यंत भारतातील २१ प्रमुख शहरातील पाणीसाठे संपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यापुढील काळात पाणी टंचाईत आणखी भर पडणार आहे. त्यामुळे वेळीच हा धोका ओळखून पाण्याचा गैरवापर टाळावा, असे आवाहन करून पाण्याचे नियोजन व व्यवस्थापनही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा. रूपेश घागी यांनी केले.
तालुक्यातील माढेळी येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी पाणी व्यवस्थापन या विषयावर शिक्षक आणि विद्यार्थ्यांकरिता आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी डोंगरगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीहरी काळे होते. तर प्रमुक्ष अतिथी म्हणून रमेश चौधरी, गटशिक्षणाधिकारी आर. आर. चौधरी, प्राचार्य एम. एस. शेख, केंद्रप्रमुख किशोर कामडी, अनिल काळे, पर्यवेक्षक दडमल उपस्थित होते.
किसन विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय माढेळीच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात बोलतना प्रा. घागी पुढे म्हणाले, फुकट मिळणाºया वस्तुंची माणसाल किंमत नसते. आज पाणी फुकटात मिळत असल्याने त्याचा गैरवापर आणि अपव्यवय सुरू आहे. हे थांबले पाहिजे. यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेतला पाहिजे. शिक्षकांमध्ये देशाला बदलण्याची शक्ती आहे. त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पाण्याचे महत्व पटवून दिले पाहिजे. एकीकडे पाणीसाठा कमी होत असताना लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पृथ्वीचा सर्वाधिक भाग पाण्याने व्यापला असतानाही पाणी अपुरे पडत आहे, ही अडचण दूर करण्यासाठी पावसाचे पाणी जमिनीतच मुरेल, अशा उपाययोजना करणे, धरणासारख्या जलाशयातील गाळ काढून पाण्याची पातळी वाढविणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून गटशिक्षणाधिकारी चौधरी यांनी पाण्याचा अपव्यव टाळण्याचे आवाहन उपस्थितांना केले.