शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

शिक्षकांची विद्यार्थ्यांसाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:38 AM

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील यावर्षीचे शैक्षणिक सत्र संपण्याच्या मार्गावर आहे. अशातच विद्यार्थी व पालकांचा कल मोठ्या प्रमाणात इंग्रजी माध्यमाकडे झुकत आहे. परिणामी मराठी माध्यमाच्या शाळा अडचणीत आल्या आहेत.

ठळक मुद्देपटसंख्येकरिता धडपड : शाळा व्यवस्थापनाचे फर्मान

अनेकश्वर मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील यावर्षीचे शैक्षणिक सत्र संपण्याच्या मार्गावर आहे. अशातच विद्यार्थी व पालकांचा कल मोठ्या प्रमाणात इंग्रजी माध्यमाकडे झुकत आहे. परिणामी मराठी माध्यमाच्या शाळा अडचणीत आल्या आहेत. प्रत्येक माध्यमाच्या शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थी शोध मोहिमेचे फर्मान सोडले आहे. शाळेतील विद्यार्थी पटसंख्या टिकविण्यासाठी ही धडपड आहे. यासाठी शिक्षक विद्यार्थी मिळविण्यासाठी सर्वत्र भटकंती करीत असल्याचे दिसून येत आहे.जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वीच्या काळात सार्वजनिक शिक्षण क्षेत्रातच शिक्षणाचे धडे गिरविले जात होते. मध्यंतरी शिक्षण क्षेत्र खासगी, अनुदानित, कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थाचा शिक्षण क्षेत्रात दबदबा निर्माण झाला. परिणामी शिक्षण क्षेत्र मोठ्या प्रमाणात सर्वत्र व्यापले आहे. यामुळे वर्ग तुकड्यात वाढ झाली. विद्यार्थ्यांशिवाय शाळा चालू शकत नाही. यातूनच शाळेशाळेत विद्यार्थी पटसंख्या पुरेशा प्रमाणात राखण्याचे आव्हान संस्था चालकासमोर उभे आहे. शाळेच्या नोकरीत कायम राहावयाचे असल्यास शाळेसाठी विद्यार्थी मिळवा, असे फर्मानच शाळेच्या व्यवस्थापनाने सोडले आहे.आजघडीला चंद्रपूर जिल्ह्यात खासगी प्राथमिक शाळेची संख्या ३१० इतकी आहे.यात अनुदानित १२५, विनाअनुदानित ३३ तर १५२ कायम विनाअनुदानित शाळांचा समावेश आहे. त्याच प्रमाणे खासगी माध्यमिक एकूण शाळा ५०६ आहेत. यामध्ये अनुदानित ३६०, विनाअनुदानित ३३ तर ११३ कायम विनाअनुदानित शाळांचा समावेश आहे.या शाळेतील शिक्षक विद्यार्थी मिळविण्यासाठी दारोदार भटकंती करीत आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद व नगरपरिषद शाळेतील शिक्षक मात्र विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करताना दिसत नाही. परिणामी दिवसेंदिवस जिल्हा परिषद व नगरपरिषद शाळेतील विद्यार्थी संख्या झपाट्याने खालावत आहे.बल्लारपुरात जि.प. व न.प. शाळा अडचणीतशिक्षण जीवनमान उंचावणारे आहे. मूल्यवर्धित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते. सार्वजनिक शिक्षण क्षेत्रामुळे गरीब पालकांच्या विद्यार्थ्यांची जडणघडण होते. परंतु शाळा जास्त व विद्यार्थी कमी अशी अवस्था बल्लारपूर तालुक्यात आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या २९ व नगर परिषदेच्या १६ शाळा विद्यार्थ्यांअभावी अडचणीत आल्या आहेत. बल्लारपूर तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २१, उच्च प्राथमिक शाळा सात तर माध्यमिक एक शाळा आहे. बल्लारपूर नगर परिषदेमध्ये १४ प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक प्रत्येकी एक शाळा आहे. खासगी प्राथमिक १० तर कायम विनाअनुदानित २५ शाळा असून खासगी माध्यमिक विभागात १७ अनुदानित, विनाअनुदानित एक व कायम विनाअनुदानित ११ अशा एकूण ११० शाळांचा समावेश बल्लारपूर तालुक्यात आहे.जिल्ह्यात २,५२४ शाळाजिल्ह्यात एकूण दोन हजार ५२४ शाळा कार्यरत आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या एक हजार ५९३, नगरपालिकेच्या ७३, शासकीय १५, खासगी प्राथमिक ३१०, खासगी माध्यमिक ४४६, सैनिकी व नवोदय विद्यालय प्रत्येकी एक तर केंद्रीय विद्यालय तीन या शाळेंचा समावेश आहे. सर्वाधिक शाळा जिल्हा परिषद प्रशासनाच्या असूनही येथील शिक्षक पटसंख्येविषयी गंभीर नाही. त्यामुळे पटसंख्या रोडावली आहे. खासगी शिक्षणसंस्थाचे विद्यार्थ्यांना व पालकांना वेगवेगळ्या प्रकारचे आमिषही याला कारणीभूत आहे. परिणामी जिल्हाभरात १५ ते २० जिल्हा परिषद शाळांवर पटसंख्याअभावी गडांतर येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी