शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

गरजुंसाठी उभी राहिली 'माणुसकीची भिंत'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

एकीकडे नियमित नवनवीन कपडे घेणारे दिसतात. तर दुसरीकडे अंगावर लावायलाही कपडे नाही,असा समाज दिसतो. पाच महिने, वर्षभर कपडे वापरले की, ते कपडे फेकायला काढणारा समाजही आहे. मात्र, आता हेच कपडे गरजू, गरिबांना वापरता येणार आहे. ‘माणुसकीची भिंत’ नावाची संकल्पना मागील काही वर्षांपासून देशभरात राबविली जात आहे.

ठळक मुद्देचंद्रपूर मनपाचा उपक्रम : ‘नको असेल ते द्या, हवे असेल ते घेऊन जा’

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : समाजात श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे नियमित नवनवीन कपडे घेणारे दिसतात. तर दुसरीकडे अंगावर लावायलाही कपडे नाही,असा समाज दिसतो. पाच महिने, वर्षभर कपडे वापरले की, ते कपडे फेकायला काढणारा समाजही आहे. मात्र, आता हेच कपडे गरजू, गरिबांना वापरता येणार आहे. ‘माणुसकीची भिंत’ नावाची संकल्पना मागील काही वर्षांपासून देशभरात राबविली जात आहे. हिच संकल्पना चंद्रपूर महानगरपालिकेने अंमलात आणली असून, तुकूम येथील दीनदयाल उपाध्याय शाळेत ही माणुसकीची भिंत उभारली आहे. यामुळे आता गरजुंना मदत मिळू शकणार आहे. तसेच जुन्या वस्तूंचा पुनर्वापर या संकल्पनेला वाव मिळणार आहे.वस्तूंचा वापर कमी करणे, त्याचा पुनर्वापर व चक्रीकरण या तत्वांचा वापर प्रत्येक शहरात केला जावा याकरिता शासन प्रयत्नशील आहे. या तीन तत्वांच्या माध्यमातून चंद्रपूर शहराचा कचरा कमी करण्यास मदत मिळणार आहे. मनपाच्या विविध उपक्रमांपैकीच हा एक नावीण्यपूर्ण उपक्रम आहे. ‘माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे’ या ब्रिदवाक्याला पूर्णपणे न्याय देणारी चंद्रपूर शहर महानगरपालिका ही संकल्पना राबवित आहे. याच धर्तीवर शहराच्या अन्य रहिवासी भागांमधेही या प्रकारच्या माणुसकीच्या भिंती उभारण्याचे प्रस्तावित असून लवकरच अंमलात आणली जाणार आहे.'माणुसकीची भिंत' ही संकल्पना आता सर्वत्र लोकप्रिय झाली आहे. 'नको असेल ते द्या व हवे असेल ते घेऊन जा', यावर आधारलेली ही भिंत गरीब, मध्यमवर्गीय, सर्वांसाठीच आकर्षक ठरत आहे. तुकूम येथील ढोबर म्हणून ओळखली जाणारी शाळा मनपाने आपल्या ताब्यात घेतल्यानंतर त्यात नावीण्यपूर्ण बदल केले आहे. आता ती दीनदयाल उपाध्याय शाळा म्हणून ओळखली जाते. या शाळेच्या भिंतीवर मनपाने नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे अनेक निराधारांना मायेची ऊब मिळणार आहे. एक हात मदतीचा, एक हात माणुसकीचा' असे आवाहन याद्वारे करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे एक वस्तू परत-परत वापरल्या जाऊ शकणार आहे, सर्व नागरिकांनी आपल्याकडील अनावश्यक पण इतरांना उपयोगी वस्तू जसे कपडे, चप्पल इत्यादी दान करण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारे करण्यात आले आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून गरीब तसेच दुर्लभ घटकांतील गरजवंतांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण देता यावे यासाठी केलेला हा छोटासा उपक्रम आहे. चंद्रपूरकरांनी आपल्या परीने या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा.- संजय काकडे, आयुक्त महानगरपालिका, चंद्रपूर

टॅग्स :Socialसामाजिक