शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

२६५ उमेदवारांना अनुकंपा नियुक्तीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 06:01 IST

शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घेण्याचा नियम आहे. संबंधित कर्मचाऱ्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाची समस्या सुटावी, त्यामागाचा व्यापक हेतू आहे. परंतु, सर्वच मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याविषयी साशंकता आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : राज्य सरकारच्या आदेशाची आडकाठी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घेण्यासाठी अर्ज सादर केलेल्या २६५ उमेदवारांना अद्याप नियुक्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेष म्हणजे राज्य शासनानेही यासंदर्भात जिल्हा परिषदांना मार्गदर्शन केले नाही. त्यामुळे नियुक्तीचा प्रश्न केव्हा सुटेल की नाही, या प्रश्न पात्र अनुकंपाधारक हतबल झाले आहेत.शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घेण्याचा नियम आहे. संबंधित कर्मचाऱ्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाची समस्या सुटावी, त्यामागाचा व्यापक हेतू आहे. परंतु, सर्वच मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याविषयी साशंकता आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या निर्णयानुसार जेवढ्या जागा रिक्त असतील त्यापैकी २० टक्केच उमेदवारांना नोकरीत सामावून घेतले जाते.प्राप्त अर्जांची संख्या अधिक असली तरी सर्वच उमेदवारांना नोकरी मिळण्याची खात्री नाही. यातील काही उमेदवारांची वयोमर्यादा संपलेली असते. यापूर्वीच्या सरकारने काढलेल्या एका आदेशानुसार उमेदवार नोकरीपासून वंचित राहण्याचीच शक्यता अधिक दिसते. अनुकंपा तत्त्वावर वर्ग चार परिचरपदावर नियुक्ती देऊ नये, असे या आदेशात नमुद आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील पात्र अनुकंपाधारकांना नोकरीत सामावून घेताना अडचणी येत आहेत.जि. प. प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये बहुतांश उमेदवार परिचर पदासाठी पात्र आहेत. परंतु, राज्य सरकारचे आदेश असल्याने संंबंधित उमेदवारांना नोकरीत सामावून घेता येत नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर सरकारचे लक्ष वेधण्यात आले. यासंदर्भात सरकारकडून मार्गदर्शन मिळाल्याशिवाय कार्यवाही करता येत नाही. राज्य सरकारकडून याबाबत जिल्हा परिषदांना अद्याप मार्गदर्शन न मिळाल्याने अनुकंपधारकांच्या नियुक्तीचा प्रश्न सुटला नाही. आधीच्या सरकारने जारी केलेल्या आदेशात दुरूस्ती झाली तरच अनुकंपाधारकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू होईल. परंतु, याबाबत अजुनही राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या नाही. त्याचा अनिष्ट परिणाम जिल्ह्यातील २६५ अनुकंपाधारकांच्या नियुक्तीवर झाला आहे. कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्याने आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.आदेशात दुरूस्ती गरजराज्य सरकारच्या जुन्या आदेशानुसार अनुकंपा तत्त्वासाठी पात्र असणाºया उमेदवारांना परिचरपदाची नियुक्ती देऊ नये, अशा सूचना आहेत. त्यामुळे अशा उमेदवारांना नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. या आदेशात दुरूस्ती करणे आता गरजेचे झाले आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद