शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलिच्या ब्लास्टिंगमुळे अनेक घरांना भेगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 06:00 IST

कोळसा उत्पादनाकरिता मातीचे मोठे ढिगारे उभे केल्याने गावात पाणी साठून आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी, शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता नागरिकांनी खाण बंद पडण्यासाठी आंदोलन सुरू केले. समस्या दूर करण्यासाठी वेकोलि प्रशासनाला अनेकदा निवेदन देण्यात आले. पण दुर्लक्ष केल्यामुळे नागरिक संप्त झाले. खाणीतील ब्लास्टिंगमुळे घरांना धोका आहे.

ठळक मुद्देनागरिकांचे आंदोलन : खाण बंद करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कमाजरी : वेकोलि माजरीच्या नागलोन-२ खुल्या कोळसा खाणीच्या ब्लास्टिंगमुळे घरांना भेगा पडत आहेत. कोळसा उत्पादनाकरिता मातीचे मोठे ढिगारे उभे केल्याने गावात पाणी साठून आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी, शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता नागरिकांनी खाण बंद पडण्यासाठी आंदोलन सुरू केले.समस्या दूर करण्यासाठी वेकोलि प्रशासनाला अनेकदा निवेदन देण्यात आले. पण दुर्लक्ष केल्यामुळे नागरिक संप्त झाले. खाणीतील ब्लास्टिंगमुळे घरांना धोका आहे. कलावती परचके यांचे घर पडले. फारूक अहमद सिद्दिकी, रमेश केसकर, छोटू कैथल, धनराज केवट, विजय केवट, गरीबदास केवट, अनिता केवट, कुंता सलाम, मारोती मंदिर, रूखमाआत्राम, लीला मेश्राम, ताराबाई मेश्राम, सुरेश केवट मंदा जोगे, निलेश कोटनाके, चंद्रभान जुमानाके, तारा गेडाम, खेमराज आत्राम, बुधाराज केवट, रामकिशोर केसकर, रामा खंडारकर, राममिलन केवट यांच्या घरांना भेगा पडल्या आहेत. त्याकरिता माजरीतील दफाई क्रमांक-१, टेकडी परिसर व महाजन नगर येथील नागरिंकांना सुरक्षित ठिकाणी पूनर्वसन करावे, अशी मागणी लावून धरली. नागलोन खाणीचे उत्पादन ठप्प असून कोळसा वाहतूक बंद आहे. वेकोलिला लाखोंचा फटका बसत आहे. नागरिकांच्या आंदोलनामुळे वेकोलि अधिकाऱ्यांनी सुरक्षा कर्मचारी व पोलिसांना घटनास्थळी प्रचारण केले आहे. वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक गुप्ता यांनी उपक्षेत्रीय प्रबंधक बी. वाल्मिकी महाप्रबंधक संचालन शर्मा व कार्मिक प्रबंधक थोरात यांना चर्चा करण्याकरिता मुख्यालय कुचना येथे बोलावले.दरम्यान, गावकऱ्यांनी चर्चा करण्याकरिता आंदोलनस्थळी यावे अशी मागणी केली. रात्री उशिरापर्यंत आंदोलनकर्ते ठिय्या मांडून होते.