शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 17:58 IST

चंद्रपुरात एका टोल कर्मचाऱ्याला वाहनाने चिरडून पळ काढल्याची घटना घडली.

Chandrapur Toll Plaza Accident: चंद्रपुरात एका टोल नाक्यावर टेम्पो चालकाने तिथल्या कर्मचाऱ्याला चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर टोल नाक्यावर एका टोल बूथ कर्मचाऱ्याने वाहन चालकाला टोल शुल्क भरण्यास सांगितल्यानंतर चालकाने त्याला चिरडले. या घटनेत टोल कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे हा सगळा प्रकार टोल नाक्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. फुटेजमध्ये वाहन चालक कर्मचाऱ्याच्या अंगावरुन गाडी नेत असल्याचे दिसत आहे.

शुक्रवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बल्लारशाहहून चंद्रपूरकडे जाणाऱ्या टाटा एस वाहनाने पैसे न भरता लेन ओलांडून टोल ओलांडण्याचा प्रयत्न केला. टोल कर्मचाऱ्याने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा चालकाने गाडी थांबवण्याऐवजी त्याला धडक दिली. या धडकेत कर्मचारी गंभीर जखमी झाला. २७ वर्षीय संजय अरुण वांधरे असे या पीडित कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो विसापूर टोल नाक्यावर कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत होता. त्याला तातडीने शहरातील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं.

या घटनेनंतर बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. टोल बूथ मॅनेजर दिलीप कंचरलावार यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हत्येच्या प्रयत्नाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. जखमी कर्मचाऱ्याला चांगल्या उपचारांसाठी नागपूरला पाठवण्यात येत असल्याचे दिलीप कंचरलावर यांनी म्हटलं.

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील विसापूर टोल नाक्यावर टाटा एसचा चालक टोल टाळण्यासाठी लाईन ओलांडत होता. यादरम्यान, तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्याच्या अंगावर गाडी घातली. त्यामुळे कर्मचारी गंभीर जखमी झाला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपीची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्हीचा वापर केला जात आहे. लवकरच आरोपीला अटक केली जाईल, अशी माहिती चंद्रपूर पोलिसांनी दिली.

टॅग्स :AccidentअपघातtollplazaटोलनाकाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी