शहरं
Join us  
Trending Stories
1
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
2
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
3
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
5
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
6
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
7
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
8
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
10
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
13
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
14
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
15
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
16
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
17
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
18
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
19
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
20
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नियमांचे उल्लंघन; 40 लाखांचा दंड केला वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 05:00 IST

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण आढळून आले. यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला. त्यामुळे शासनाने कठोर नियम करीत लॉकडाऊन सुरू केले होते. लॉकडाऊन काळात वाहतूक शाखेच्या वतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत होती. यासाठी चौकाचौकात पोलिसांचे नाके लावण्यात आले होते.

ठळक मुद्देवाहतूक पोलिसांची कारवाई : वाहतूक नियमांचेही पालन नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊन काळात शासनाने विविध निर्बंध घातले होते. विनाकारण फिरणे, विनामास्क फिरणे यासह मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर १६ हजार २१७ जणांवर कारवाई करून ३९ लाख ४५ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण आढळून आले. यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला. त्यामुळे शासनाने कठोर नियम करीत लॉकडाऊन सुरू केले होते. लॉकडाऊन काळात वाहतूक शाखेच्या वतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत होती. यासाठी चौकाचौकात पोलिसांचे नाके लावण्यात आले होते. यामध्ये विनाकारण घराबाहेर पडणे, विनामास्क फिरणे, विनाहेल्मेट, ट्रिपल सिट, फॅन्सी नंबर, सिग्नल तोडणे यासह मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उचलण्यात आला. १५ एप्रिल २०२१ ते ६ जून २०२१ या दोन महिन्यांच्या कालावधीत तब्बल ३९ लाख ४५ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलिसांची ही मोहीम अद्यापही सुरुच असून दंड आकारला जात आहे.  

विनामास्क फिरणे भोवलेकोरोनामुळे विनामास्क फिरणाऱ्यावर बंदी घातली होती. मात्र अनेकजण विनामास्क फिरत होते. अशांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला होता. जिल्ह्याभरातच पोलिसांकडून ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत पोलिसांनी अनेकांवर कारवाई करीत लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मनपा, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत आदी विभागातर्फेही विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. 

चंद्रपूर सर्कलमध्ये   सर्वाधिक दंड वसूलचंद्रपूर सर्कलअंतर्गत येणाऱ्या बल्लारपूर, शहर, रामनगर, पडोली, दुर्गापूर, घुग्घुस पोलीस स्टेशनअंतर्गत ८२८४ जणांवर कारवाई करून १९ लाख १७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर सीटी टीआर पोलिसांनी सर्वाधिक ३६८५ जणांवर कारवाई करीत आठ लाख ८७ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. 

कोरोनामुळे मास्क घालूनच फिरावे, विनाकारण फिरू नये, असे निर्देश असतानाही अनेकजण विनाकारण फिरत असतात, तर बहुतेकजण वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. अशांवर वाहतूक विभागातर्फे कारवाई करण्यात येते. कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी कोरोना अद्याप गेलेला नाही. त्यामुळे मास्क घालूनच बाहेर पडावे. - हृदयनारायण यादव, वाहतूक पोलीस निरीक्षक, चंद्रपूर

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस