दारूबंदीसाठी गावकऱ्यांनी पुढे यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 11:32 PM2017-12-01T23:32:30+5:302017-12-01T23:33:34+5:30

पोलीस जनतेचे मित्र आहेत. गावातील वाईट गोष्टींना किंवा त्यास प्रोत्साहन देणाºया व्यक्तींना आळा घालण्याकरिता तसेच गावातील शांतता सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस सतत प्रयत्न करीत असतात.

The villagers should come forward for drinking | दारूबंदीसाठी गावकऱ्यांनी पुढे यावे

दारूबंदीसाठी गावकऱ्यांनी पुढे यावे

googlenewsNext
ठळक मुद्देशेखर देशमुख : कुडेसावलीत जनजागरण मेळावा

आॅनलाईन लोकमत
कोठारी : पोलीस जनतेचे मित्र आहेत. गावातील वाईट गोष्टींना किंवा त्यास प्रोत्साहन देणाºया व्यक्तींना आळा घालण्याकरिता तसेच गावातील शांतता सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस सतत प्रयत्न करीत असतात. या प्रयत्नात गावकऱ्यांनी सहकार्य केल्यास पोलिसांचा ताण कमी होवून गावात शांतता नांदेल. सद्या जिल्ह्यात दारूबंदी आहे. पोलीस अहोरात्र प्रयत्न करून ती यशस्वी करीत आहेत. मात्र यासाठी गावकऱ्यांनी पुढे सरसावल्याशिवाय ती यशस्वी होवू शकत नाही. यासाठी प्रत्येक गावात ग्राम संरक्षण दलाची निर्मिती करण्यात येणार असल्याचे राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख यांनी सांगितले.
कोठारी पोलीस स्टेशनअंतर्गत पोलीस प्रशासन, एकात्मीक आदिवासी विकास विभाग, महसुल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कुडेसावली येथील अनुदानित आदिवासी आश्रम शाळेच्या पटांगणात जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ते बोलत होते.
उद्घाटक म्हणून जि.प. सदस्य वैष्णवी बोडलावार होत्या. प्रमुख अतिथी म्हणून गोंडपिपरीचे संवर्ग विकास अधिकारी यशवंत मोईते, तहसिलदार किशोर येरमे, शिवाजी शिक्षण ग्रामीण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विलास भोगरकर, तोहोगावचे सरपंच हंसराज रागीट, कुडेसावलीच्या सरपंच सूर, उमरीच्या ठाणेदार मसराम, पोलीस पाटील आम्रपाली चांदेकर, मुख्याध्यापक शेख, एस. डी. बुरांडे आदी उपस्थित होते.
उपस्थितांना स्वच्छतेची प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी विविध विभागाकडून शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी स्टॉल लावण्यात आले होते. उपस्थित अधिकाºयांनी लोकांना शासकीय योजनांची माहिती आपल्या भाषणातून दिली. प्रास्ताविक कोठारीचे ठाणेदार संतोष अंबिके यांनी केले. संचालन व आभार सचिन फुलझेले, प्रवीण ढोडरे यांनी केले.
या कार्यक्रमात धनंजय तावाडे यांनी अंधश्रद्धेवर आधारीत विविध विज्ञान प्रयोग सादर करून बुवाबाजीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला. या मेळाव्याला कोठारी, कुडेसावली, परसोडी, तोहोगाव, काटवली, बामणीसह सर्व पोलीस पाटील व उपस्थित होते. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचारी, शाळेच्या कर्मचाºयांनी सहकार्य केले.
खेळाडूंना साहित्याचे वाटप
या मेळाव्यात युवकांना खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले. त्यात व्हॉलीबाल, क्रिकेट किट आदी साहित्याचा समावेश होता. तर आश्रम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मच्छरदाणी वाटप करण्यात आले. यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांनी रेला, आदिवासी नृत्य, लावणी, आदींचे उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

Web Title: The villagers should come forward for drinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.