शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

‘त्या’ जिवलग मित्रांच्या मृत्यूने पाणावले गावकऱ्यांचे डोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 6:00 AM

गोवरी येथील संतोष रामकिसन लांडे (२७) व प्रीतम श्रीहरी परसुटकर (२५) या दोन जिवलग मित्रांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. सकाळी हसत-खेळत आनंदी असणारे दोन्ही चेहरे अचानक कायमचे निघून गेले. गावात निधनाची वार्ता धडकताच स्मशान शांतता पसरली. दुसºया दिवशी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान एकाच रूग्णवाहिकेतून दोघांचेही शव गावात आणल्यानंतर अनेकांनी एकच हंबरडा फोडला.

ठळक मुद्देगोवरीत शोककळा । गावात पेटल्या नाही चुली

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : मृत्यू हे आयुष्यातले अंतिम सत्य आहे. मृत्युला कुणालाही नाकारता येत नाही. मात्र, अकाली नको, ही मानवाची इच्छा असते. येथील दोन जिवलग मित्रांचा दुचाकी अपघातात अकाली बळी गेल्याने चितेकडे पाहून गावकऱ्यांचे डोळे पाणावले. शुक्रवारी गावात कुणाचीही चूल पेटली नाही.गोवरी येथील संतोष रामकिसन लांडे (२७) व प्रीतम श्रीहरी परसुटकर (२५) या दोन जिवलग मित्रांचा दुचाकी अपघातातमृत्यू झाला. सकाळी हसत-खेळत आनंदी असणारे दोन्ही चेहरे अचानक कायमचे निघून गेले. गावात निधनाची वार्ता धडकताच स्मशान शांतता पसरली. दुसºया दिवशी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान एकाच रूग्णवाहिकेतून दोघांचेही शव गावात आणल्यानंतर अनेकांनी एकच हंबरडा फोडला. वृद्धापकाळात आपल्या भावासोबत आईवडिलांचा आधार ठरणारे दोन युवक जीव कायम नजरेआड झाल्याने गावकºयांनी अन्नालाही शिवले नाही. संतोष लांडे या युवकाचा १२ एप्रिल २०२० रोजी विवाह ठरला होता. त्यामुळे संतोषच्या घरी लग्नाची तयारी जोरात सुरू होती. भावी जोडीदारासोबत आयुष्याची स्वप्ने रंगवित संतोषही आनंदाने घराची कामे करीत होता. घरात सर्वत्र आनंदी वातावरण होते. प्रीतम परसुटकर नुकताच मार्केटिंगचे काम करणाºया एका खासगी कंपनीत कामाला लागला होता. घरी आईवडिलांना आधार व्हावा म्हणून तोही मोठ्या जिद्दीने कामे करायचा. लहानपणी एकाच अंगणात खेळणाºया या दोन जिवलग मित्रांना आपण एकाच वेळेस दोघेही जगाचा निरोप घेणार असा विचारही कधी शिवला नसावा? मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते.संतोष हा स्वत:च्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटप करून घराकडे परतत असताना आणि प्रीतम गावाकडून राजुरा येथे काही कामानिमित्त जात असताना अचानक नियतीने डाव साधला.दोघांच्याही दुचाकींची समोरासमोर जबर धडक झाल्याने दोनही जिवलग मित्रांचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची वार्ता गावात पसरताच येथे शोककळा पसरली. गावात काही घरी चूली पेटल्या नाही. नियतीने एवढा जबरदस्त आघात कुटुंबियांवर केला की त्यांच्या आयुष्यात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली. दोन मित्रांचे अकाली जाणे मनाला कायमचे चटका लावून गेले. शांत व मनमिळावू स्वभावाच्या दोन्ही मित्राने कायमचा जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पेटलेल्या चितेकडे गावकºयांना हुंदके आवरता आले नाही.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू