चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसनेभाजपाला धोबीपछाड देत सर्वात मोठा पक्ष म्हणून मुसंडी मारली. पण, बहुमतापर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळेच चंद्रपुरातील राजकारण रंगलं आहे. एकीकडे भाजपाकडूनकाँग्रेसचे नगरसेवक फोडण्यासाठी ऑपरेशन लोटस सुरू केले आहे, तर दुसरीकडे काँग्रेसमध्येच वादाचा भडका उडाला आहे. विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातच संघर्षाची ठिणगी पडली असून, धानोरकरांनी थेट राजीनामे देण्याचाच इशारा दिला आहे.
वडेट्टीवारांनी नगरसेवकांना घरातून उचलून नेले
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पक्षाचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावर घणाघाती हल्ला केला. धानोरकर म्हणाल्या की, "खरंतर विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसचे ३० नगरसेवक निवडून आल्यानंतर सत्ता स्थापनेचा प्रयत्न करायचा होता. पण, त्यांनी नगरसेवकांना घरातून उचलून गटबाजी सुरू केली आहे. असे करायला नको होते. त्यामुळे उर्वरित नगरसेवक सुरक्षित रहावे म्हणून आम्ही त्यांना हॉटेलला हलवले आहे", असा गंभीर आरोप प्रतिभा धानोरकर यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर केला आहे.
"चंद्रपूर हा माझा लोकसभा मतदारसंघ आहे. त्यांनी माझ्या मतदारसंघात ढवळाढवळ करू नये ही आमची मागणी आहे. नाहीतर उद्याला आम्ही त्यांच्या ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात ढवळाढवळ करू", असा इशारा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विजय वडेट्टीवार यांना दिला आहे.
"आमची मागणी मान्य केली नाही, तर पक्षाला आमची गरज नसेल तर आम्ही सामूहिक राजीनामा देऊ", असा संताप धानोरकरांनी व्यक्त केला आहे.
चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेचा गुंता काय?
चंद्रपूर महापालिका निवडणुकीत भाजपाचे २४ नगरसेवक जिंकून आले आहेत. तर काँग्रेसचे २७ नगरसेवक निवडून आले आहेत. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी ३४ नगरसेवकांचे बहुमत आवश्यक आहे. मात्र, काँग्रेसला अजूनही चार नगरसेवकांची गरज आहे.
उद्धवसेनेचे ६ नगरसेवक जिंकून आले असून, त्यामुळे उद्धवसेना किंगमेकर ठरली आहे. उद्धवसेनेला सोबत न घेता काँग्रेस नगरसेवकांचाच गट सोबत घेण्याचा प्रयत्न भाजपाचा आहे. सुधीर मुनगंटीवार यांनीच त्याबद्दल माहिती दिली आहे. तर काँग्रेसमध्ये आपसातच वाद लागला आहे.
Web Summary : Chandrapur Congress faces turmoil as MP Pratibha Dhanorkar accuses Vijay Wadettiwar of taking councilors, threatening resignations if demands aren't met amid power struggles.
Web Summary : चंद्रपुर कांग्रेस में उथल-पुथल, सांसद प्रतिभा धानोरकर ने विजय वडेट्टीवार पर पार्षदों को ले जाने का आरोप लगाया, सत्ता संघर्ष के बीच मांगें पूरी न होने पर इस्तीफे की धमकी।