शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

मुख्यमंत्र्यांच्या दौºयाकडे लागल्या नजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:47 IST

चिमूर स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या स्वातंत्र्यविरांना मानवंदना देण्यासाठी देशाचे महामहीम राष्टÑपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह अनेकांनी या भूमीत आले.

ठळक मुद्देचिमूरवासीयांचा सवाल : स्वातंत्र्यवीराच्या बलिदानाला न्याय मिळेल काय?

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या स्वातंत्र्यविरांना मानवंदना देण्यासाठी देशाचे महामहीम राष्टÑपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह अनेकांनी या भूमीत आले. चिमूर स्वातंत्र लढ्याचा इतिहास पाहता चिमूर क्रांती जिल्ह्याचे आश्वासने दिलीत. मात्र चिमूर स्वातंत्र लढ्याच्या हिरक वर्षातही चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी शासन दरबारी खितपत पडली आहे. त्यामुळे अनेक आश्वासनानंतरही चिमूरकरांची झोळी रिकामीच आहे. इंग्रजकालीन परगणा असलेल्या चिमूरला स्वतंत्र भारतात क्रांती जिल्हा म्हणून घोषित केले जाईल काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १६ आॅगस्टला चिमुरात येत आहेत. या पार्श्वभूमीवर चिमूरसह वरोरा, नागभीड, ब्रह्मपुरी या तालुक्यांकडूनही जिल्ह्याची मागणी होत आहे. एकूणच आता सर्वांच्या नजरा मुख्यमंत्र्यांच्या दौºयाकडे लागल्या आहेत.१६ आॅगस्ट १९४२ ला चिमुरात इंग्रजाविरुद्ध रणसंग्राम झाला आणि चिमूर देशात प्रथमच तीन दिवस स्वतंत्र झाला. या तीन दिवस स्वातंत्र्यांची नोंद सुभाषचंद्र बोस यांनी बर्लीन रेडीओवरुन केली होती. या स्वातंत्र्यासाठी २१ क्रांतीविरांना फाशीची शिक्षा, २८ क्रांतीविराना जन्मठेप, ३०० चिमूरकरांना ब्रिटीश सरकारने अटक केली तर तीन क्रांतीवर शहीद झाले. इतकी किंमत चिमूरकरांनी चुकविली होती. चिमूरच्या स्वातंत्र्याची दखल पूर्ण जगाने घेतली होती. चिमूरचा स्वातंत्र लढा पूर्ण देशाच्या स्वातंत्र लढ्याचा मानबिंदू ठरला होता.इंग्रज राजवटीत चिमूर शहर ‘परगणा’ असल्याची नोंद इतिहासात आहे. त्यामुळे चिमूर क्रांती जिल्हा घोषित करावा, अशी मागणीस स्वतंत्र्य भारतात मागील ४७ वर्षापासून चिमूरकर करीत आहेत. आगस्ट महिना आला की राजकीय पुढाºयासह शासनाला चिमूरच्या लढ्याची आठवण होते आणि यासाठी देशाचे राष्टÑपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्री महोदय या भूमीला वंदन करुन गेलेत व जिल्ह्याचे आश्वासनही देवून गेलेत. मात्र अजून हिरक वर्षातही चिमूरकरांच्या स्वातंत्र लढ्यासाठी सांडवलेल्या रक्ताला न्याय मिळाला नाही. चिमूर क्रांती जिल्ह्याच्या मागणीसाठी मागील ४७ वर्षात अनेक आंदोलने झाली. एक आंदोलन उग्र झाले होते. चक्क तहसील कार्यालयाची जाळपोळ करण्यात आली होती. तरी त्या शासनकर्त्यांना जाग आली नाही. इंग्रज राजवटीत चिमूर परगणा (जिल्हा) होता. इंग्रजाचा कारभार चिमूरवरुन चालायचा. आजच्या घडीला चिमूर चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून ९३ ग्रामपंचायती आहेत. तर चिमूरमध्ये अनेक विकासकामाच्या दृष्टीने भौगोलिक परिस्थिती आहे.आंदोलनकर्ते स्थानबद्धचिमूर क्राती जिल्ह्याच्या मागणीसाठी आज रविवारी चक्काजाम आंदोलनं करीत असताना अटक करण्यात आलेले शिवसेना तालुका प्रमुख धरमसिह वर्मा, जिल्हा कृती समिती अध्यक्ष नरेंद्र बंडे, बाळुभाऊ बोभाटे, अविनाश अगडे, विलास मोहीनकर, मोतीराम लाखे, गजानन अगडे, मंगेश भैसारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना स्थानबध्द करण्यात आले.तीच खरी श्रध्दांजलीचिमूरकर जे मागत आहेत, ते त्यांना मिळतच नाही. चिमूरकर म्हणतात, क्रांती जिल्हा हवा आहे. भारताच्या स्वातंत्र लढ्यात चुकविलेली किंमत आजही आम्ही भोगत आहेत. चिमूर स्वातंत्र लढ्याचे नाव सूवर्ण अक्षरानी इतिहासात लिहिले गेले आहे. स्वातंत्र्यानंतर संघराज्य निर्माण झाला. त्यात अनेक राज्य, जिल्हे निर्माण झालेत. मात्र चिमूर आजही उपेक्षितच राहिले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिमूर स्वातंत्र्य लढ्याच्या हिरक वर्षात चिमूर क्रांती जिल्ह्याच्या निर्मितीचा शब्द देवून त्या स्वातंत्रविरांना खरी श्रद्धांजली अर्पण करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या तालुक्यांनाही अपेक्षाआपला तालुकाही जिल्हा व्हावा, अशी अपेक्षा चिमूरसह नागभीड, ब्रह्मपुरी आणि वरोरा तालुकावासीयांचीही आहे. भौगोलिकदृष्टया त्यांचा परिसरही जिल्ह्यासाठी योग्य आहे, असा त्या त्या तालुकावासीयांचा दावा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हालाही न्याय द्यावा, अशी मागणी वरोरा, नागभीड व ब्रह्मपुरी तालुकावासीयांनी केली आहे.