शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

गिधाडाचे संगोपन, संवर्धनासाठी उपहारगृह

By admin | Updated: April 3, 2015 01:05 IST

मेलेल्या जनावरांमुळे गावात होणारी अस्वच्छता हटविण्यासाठी गिधाडाची महत्त्वाची भूमिका असायची.

चिचपल्ली वनपरिक्षेत्र : वनपालाचा अभिनव उपक्रमराजू गेडाम ल्ल मूलमेलेल्या जनावरांमुळे गावात होणारी अस्वच्छता हटविण्यासाठी गिधाडाची महत्त्वाची भूमिका असायची. मात्र गिधाडाची संख्या आपोआप घटल्याने गावात मेलेल्या प्राण्यांमुळे विविध आजाराला आमंत्रण मिळत आहे. याची दखल घेत गिधाडाचे संगोपन व संवर्धन करण्यासाठी चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील केळझरचे वनपाल विदेश गलगट यांनी ‘गिधाड उपहार गृह’ सुरू केला आहे. दाबगाव (मक्ता) येथील कक्ष क्र. ६८५ मध्ये सदर उपहारगृह निर्माण केले असून गिधाड नष्ट झाल्याने जी प्राण्यांची अन्न साखळी खुटंली आहे, ती जोडण्याचा प्रयत्न वनपाल विदेश गलगट व त्यांचे सहकारी करीत असल्याने सदर उपक्रमाचे कौतुक होत आहे.पूर्वीच्या काळात गिधाडाची संख्या मोठ्या प्रमाणात होती. मेलेली जनावरे गावाबाहेर टाकल्यानंतर त्यात गिधाडे तुटून पडून असलेले मास भक्ष करायचे.त्यामुळे गावात होणारी अस्वच्छता टाळता येत होती. विशेषत: गावात मळेखट, आखर, गायरान, डोरफोडी अशा ठिकाणी मेलेली जनावरे टाकली जायची. मात्र दिवसेंदिवस बैलाचे मांस खाण्याचे प्रमाण वाढले, तेव्हापासून बैलाचे मांस मिळणे दुरपास्त झाले. तसेच पर्यावरणाचा ढासळतत चाललेला समतोल बघता गिधाड नामशेष होण्याला कारण ठरले. ज्या वनविभागात आपण काम करतो त्यात नवनवीन उपक्रम राबविले तर इतरांना प्रेरणा मिळू शकते, हे हेरुन वनपाल विदेश गलगट यांनी वनपरिक्षेत्र कार्यालय चिचपल्ली येथील सहाय्यक वनसंरक्षक विवेक मोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी पठाण यांना गिधाडांचे संगोपन व संवर्धन करण्यासाठी उपहार गृहाची कल्पना दिली. त्यानंतर गलगट यांनी सुशी येथील वनरक्षक कैलास तोडासे, वनमजूर, रवी कवळे, पुरुषोत्तम वाढई, राजकुमार वेलादी, रफीक शेख, बबन ढोले यांच्याशी उपगृहार गृहाची मांडणी व रचनेबाबत चर्चा केली. त्यानंतर दाबगाव मक्ता येथील कक्ष क्र. ६७५ मध्ये गिधाड उपहार गृह उभारले. असे आहे उपहारगृहवनविभागाने उभारलेल्या उपहारगृहात गिधाडांना बसण्यासाठी मचान स्वरूपात मंडप उभारण्यात आले आहे. येथे उंच झाडेदेखील आहेत. मेलेल्या प्राण्यांचे मांस त्यात टाकून ठेवल्याचे दिसून आले. मेलेल्या प्राण्यांच्या वासाने गिधाड हमखास येतात, असा आजपर्यंतचा अंदाज असल्याने हा प्रयोग उपायोगी ठरेल, असा विश्वास वनपाल विदेश गलगट यांना आहे.