परीक्षेच्या दिवसामध्येच विद्यार्थ्यांसाठी ‘मूल्यवर्धन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 11:18 PM2020-03-06T23:18:37+5:302020-03-06T23:19:13+5:30

मागील काही वर्षांमध्ये इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे. त्यामुळे गावागावांतील मराठी शाळांची स्थिती पूर्वीसारखी नाही. त्यामुळे मराठी शाळांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्यशासन तसेच शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे. असे असले तरी इंग्रजी शाळांच्या तुलनेमध्ये स्पर्धा करताना प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण विभाग शिक्षकांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून अपडेट करण्याचा प्रयत्न करीत आहे.

'Value Addition' for students on exam day | परीक्षेच्या दिवसामध्येच विद्यार्थ्यांसाठी ‘मूल्यवर्धन’

परीक्षेच्या दिवसामध्येच विद्यार्थ्यांसाठी ‘मूल्यवर्धन’

googlenewsNext
ठळक मुद्देसंघटनांमध्ये संताप : विद्यार्थी-शिक्षकांना नाहक त्रास

साईनाथ कुचनकार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सध्या परीक्षेचा कालावधी आहे. विद्यार्थी अभ्यासात व्यस्त असतानाच चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राऊंडवर १२ ते १४ मार्च दरम्यान मुल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढले आहे. यामुळे शिक्षक व काही संघटनांमध्ये नाराजीचा सूर आहे.
मागील काही वर्षांमध्ये इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे. त्यामुळे गावागावांतील मराठी शाळांची स्थिती पूर्वीसारखी नाही. त्यामुळे मराठी शाळांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्यशासन तसेच शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे. असे असले तरी इंग्रजी शाळांच्या तुलनेमध्ये स्पर्धा करताना प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण विभाग शिक्षकांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून अपडेट करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र या प्रशिक्षणामुळेही शिक्षक त्रस्त झाले आहे. त्यातच शासकीय ससेमीरासुद्घा शिक्षकांच्या डोक्यावर कायम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवायचे की, प्रशिक्षण आणि इतरच कामे करायचे असा प्रश्न शिक्षक उपस्थित करीत आहे. हे सर्व कमी की, काय आता १२ ते १४ मार्च दरम्यान चांदा क्लब ग्राऊंडवर पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी मुल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत पोस्टर प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सकाळी ९.३० ते ५ या वेळेत विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह भेट द्यायची आहे. इंग्रजी शाळांचे विद्यार्थी अभ्यासात मग्न असताना जि.प. शाळेतील शिक्षकांना विद्यार्थ्यांना घेऊन चंद्रपूर येथे यावे लागणार आहे.

पाठ्यक्रम सराव, अध्ययन निष्पत्ती चाचणी तसेच वार्षिक परीक्षेच्या काळात शिक्षक व विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढणे चुकीचे आहे. जे काही उपक्रम राबवायचे आहे ते शाळेत राबवावे. त्यासाठी प्रशिक्षण वा अन्य उपक्रम घेऊ नये. त्यापेक्षा अशा संस्थानी प्रयोगशील शाळेला उपक्रम राबविण्यासाठी आर्थिक मदत करावी.
- हरीश ससनकर, राज्य सरचिटणीस
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती

वर्षभरातील शिक्षकांचे प्रशिक्षण
अध्ययन निष्पत्ती, मूल्यवर्धन प्रशिक्षण, बीएलओ प्रशिक्षण, मुख्याध्यापक सभा, मॅजिक बॉक्स प्रशिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान प्रशिक्षण, इंग्रजी विषयाचे प्रशिक्षण, या व्यतिरिक्त शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची तयारी करणे, नवोदय परीक्षा, सहल, स्हेहमिलन, विज्ञान प्रदर्शन यामध्येही शिक्षकांचा अतिरिक्त वेळ जात आहे.

शासन तसेच प्रशासनाच्या वतीने शाळांचा दर्जा वाढविण्या प्रयत्न केले जात असले तरी अनेकवेळा याचा अतिरेक होत आहे. त्यामुळे शिक्षकांना शिक्षणाकडे कमी आणि प्रशिक्षणाकडे अधिक वेळ द्यावा लागत आहे. अशा विविध कार्यक्रमांमुळे संताप व्यक्त केला जात आहे. सुट्यांमध्ये असे कार्यक्रम घेण्यासाठी शिक्षक आग्रही आहे.

Web Title: 'Value Addition' for students on exam day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.