चंद्रपूर : भाजप नेते तथा आमदार परिणय फुके यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका करताना काँग्रेसच्या अंतर्गत गोंधळावर बोट ठेवले आहे. वडेट्टीवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना फुके म्हणाले, "नाचता येईना अंगण वाकडं अशी सध्या वडेट्टीवारांची अवस्था आहे. ते आपल्या प्रदेशाध्यक्षांचे किंवा पक्षश्रेष्ठींचे ऐकत नाहीत आणि त्यांचे नगरसेवकही त्यांचे ऐकत नाहीत."
चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरूनही सत्ता स्थापन करू न शकल्याचा उल्लेख करत फुके यांनी याला "अत्यंत लाजिरवाणी बाब" असे म्हटले. काँग्रेसमधील आपापसातील भांडणांमुळेच जनता त्यांना मतदान करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. "निवडणूक हरल्यानंतर ईव्हीएम किंवा इतर कारणांवर दोष देण्याची त्यांची सवय झाली आहे," असेही ते म्हणाले.
फुके पुढे म्हणाले, "वडेट्टीवार किंवा काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याच्या घरी माशी जरी शिंकली तरी त्याचा दोष भाजपवर दिला जातो. विरोधकांना झोपेतही भाजपच दिसतो."
चंद्रपुरात भाजपचाच महापौर : फुके
चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपच सत्ता स्थापन करणार असल्याचा ठाम दावा करत फुके म्हणाले, "चंद्रपुरात १०० टक्के भाजपची सत्ता येईल आणि भाजपचाच महापौर होईल." काँग्रेसचे गटागटात विभाजन झाल्यामुळे आगामी काळात वेगळे गट तयार होण्याची शक्यता असून स्थिर सरकार देण्यासाठी तो गट भाजपकडे येऊ शकतो, असेही त्यांनी सूचित केले.
शरद पवार व मविआबाबत भाष्य
शरद पवार आणि महाविकास आघाडीबाबत बोलताना फुके म्हणाले, "शरद पवार साहेब अत्यंत प्रगल्भ नेते आहेत. महाविकास आघाडी आणि शिवसेना (उबाठा) हे बुडते जहाज आहे. शरद पवार साहेब अशा बुडत्या जहाजात बसतील असे मला वाटत नाही. पुढे-मागे ते महायुतीत येतील."
भुजबळ क्लीन चिटवर स्पष्टीकरण
छगन भुजबळ यांना मिळालेल्या क्लीन चिटबाबत फुके यांनी स्पष्ट केले की, ही क्लीन चिट भाजप किंवा राज्य सरकारने नव्हे तर न्यायालयाने दिली आहे. पुरावे नसल्याने किंवा जेही तथ्य मांडल्यामुळे न्यायालयाने दिलेला हा निर्णय आहे, यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही, असे ते म्हणाले.
शरद पवार पक्ष एनडीएमध्ये?
शरद पवार यांचा पक्ष एनडीएमध्ये येण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना फुके म्हणाले, "या गोष्टी सध्या चर्चेत आहेत. फारसे ठोस तथ्य नाही, मात्र वेळेनुसार बदल नक्कीच घडतील." भाजपच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधक अस्वस्थ झाले असून आगामी निवडणुकांत जनतेचा कौल भाजपलाच मिळेल, असा विश्वास परिणय फुके यांनी व्यक्त केला.
Web Summary : Parinay Fuke asserts BJP will dominate Chandrapur, citing Congress' internal conflicts. He dismisses Wadettiwar's criticisms and anticipates shifts in political alliances, including potential NDA inclusion of Pawar's party. Fuke also clarified Bhujbal's acquittal was court-ordered, not politically influenced.
Web Summary : परिणय फुके का दावा है कि भाजपा चंद्रपुर में हावी रहेगी, जिसका कारण उन्होंने कांग्रेस के आंतरिक संघर्षों को बताया। उन्होंने वडेट्टीवार की आलोचनाओं को खारिज किया और राजनीतिक गठबंधनों में बदलाव की उम्मीद जताई, जिसमें पवार की पार्टी का संभावित एनडीए में शामिल होना भी शामिल है। फुके ने यह भी स्पष्ट किया कि भुजबल की रिहाई अदालत के आदेश पर हुई थी, न कि राजनीतिक प्रभाव के कारण।