शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

बसमध्ये तिकीट ट्रेचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:28 IST

चंद्रपूर : महामंडळाने तंत्रज्ञानाच्या युगात पाऊल टाकीत तिकिटे फाडण्यासाठी नवी मशीन आणली होती. त्या मशीनद्वारे वाहक तिकीट फाडत होते; ...

चंद्रपूर : महामंडळाने तंत्रज्ञानाच्या युगात पाऊल टाकीत तिकिटे फाडण्यासाठी नवी मशीन आणली होती. त्या मशीनद्वारे वाहक तिकीट फाडत होते; मात्र काही वर्षांतच या मशीनमध्ये बिघाड झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा जुन्या तिकीट ट्रेचा वापर सुरू आहे. काही मशीन चार्जिंग करण्यासाठी चार्जर नसल्याने मशीन बंद आहेत.

बारमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन

चंद्रपूर : मागील सहा वर्षांपासून बंद असलेली दारू दुकाने पुन्हा सुरू करण्यात आली आहेत; मात्र या दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे सर्वच बाजारपेठ सायंकाळी ८ वाजेपर्यंत सुरू आहेत; मात्र बारमध्ये मोठी गर्दी उसळत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

युवकांना राजकीय धडे देण्याची गरज

चंद्रपूर : सर्वच क्षेत्रांत युवक जात असले तरी राजकारणात युवकांचा शिरकाव कमी दिसून येत आहे. अनेकांमध्ये राजकारणाबाबत अनास्था आहे. त्यामुळे राजकीय पद्धतीबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी युवकांना राजकीय विश्लेषकांद्वारे मार्गदर्शन देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

मुलींना कराटेचे प्रशिक्षण द्यावे

चंद्रपूर : दिवसेंदिवस मुलींच्या अत्याचारात वाढ होत आहे. त्यामुळे मुलींना आत्मसंरक्षणासाठी कराटेचे प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. दररोज एक तरी मुलगी छेडछाडीची किंवा अत्याचाराची बळी ठरत आहे. मुलींना त्रास देणाऱ्या नराधमांना धडा शिकविण्यासाठी प्रत्येक गाव, तालुका, शहर पातळीवर मुलींना कराटेचे प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

वजन काट्यांची तपासणी करावी

चंद्रपूर : दरवर्षी विक्रेत्यांच्या वजनकाट्याची तपासणी करण्याचे निर्देश आहेत; मात्र अनेक व्यापाऱ्यांकडून या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. भाजी बाजारामध्ये तर अनेक विक्रेते वजनाऐवजी दगडाचा वापर करताना दिसून येत आहेत. त्यामुळे ग्राहकांची लूट होत असल्याचे दिसून येत आहे.

दुभाजकावरील झाडांची कटाई करावी

चंद्रपूर : शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दुभाजक तयार केले आहेत. येथे मोठ्या प्रमाणात सुशोभित झाडे लावण्यात आली आहेत; मात्र ही झाडे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्यामुळे या झाडांची छाटणी करावी, अशी मागणी होत आहे.

पोलीस भरती प्रशिक्षण राबवावे

चंद्रपूर : गृहविभागाने पोलीस भरती घेण्याची घोषणा केली आहे, तसेच सैन्यभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक या भरतीत सहभागी व्हावे, या उद्देशाने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर राबविण्यात यावे, अशी मागणी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांकडून होत आहे.

मोफत संगणक प्रशिक्षण द्यावे

चंद्रपूर : सगळीकडे संगणकीय कामाला सुरुवात झाली आहे. संगणक साक्षरता वाढविणे गरजेचे आहे. पूर्वी शासनातर्फे मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात येत होते; मात्र आता हे प्रशिक्षण बंद करण्यात आले आहे. याउलट खासगी संगणकचालक वारेमाप पैसे घेतात. त्यामुळे गरजू व गरीब विद्यार्थी ते शिक्षण घेऊ शकत नाहीत, त्यामुळे शासनाने मोफत संगणक प्रशिक्षण शिबिर राबवावे, अशी मागणी होत आहे.

महिला शौचालयाची निर्मिती करावी

चंद्रपूर : शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे; मात्र शहरातील एकाही चौकात महिला शौचालय नाही. त्यामुळे महिलांची मोठी कुचंबना होते. अनेकदा महिला शौचालयाची मनपाकडे मागणी करण्यात आली; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.