सोशल मीडियाचा वापर जरा जपून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2022 05:00 IST2022-05-11T05:00:00+5:302022-05-11T05:00:42+5:30
सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली येथील प्रा. डॉ. प्रगती नरखेडकर यांच्या मार्गदर्शनात अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून सायबर सुरक्षा या विषयावर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सायबर पोलीस ठाणे चंद्रपूर येथील मुजावर अली उपस्थित होते.

सोशल मीडियाचा वापर जरा जपून
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सध्याचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. अशा युगात जगताना काहीवेळा सोशल मीडियापासून फसवणूक होण्याची शक्यता असते. तेव्हा युवकांनो सोशल मीडियातून होणाऱ्या फसवणुकीपासून सावध व्हा, असे मत सायबर सेल चंद्रपूरचे मुजावर अली यांनी केले.
सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली येथील प्रा. डॉ. प्रगती नरखेडकर यांच्या मार्गदर्शनात अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून सायबर सुरक्षा या विषयावर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सायबर पोलीस ठाणे चंद्रपूर येथील मुजावर अली उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे म्हणजे काय? सध्याच्या युगात सायबर गुन्ह्यात अडकलेले युवक आणि त्यांची परिस्थिती व यापासून दूर राहण्याच्या उपाययोजना विद्यार्थ्यांना सांगितल्या.
अध्यक्षस्थानी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील साकुरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रा. नरेंद्र टिकले, अंतर्गत तक्रार निवारण समिती प्रमुख प्रा. डॉ. प्रगती नरखेडकर व समितीतील सर्व सदस्य व प्राध्यापकवृंद उपस्थित होते. संचालन अनिकेत दुर्गे यांनी, तर आभार पूनम रामटेके यांनी मानले. यावेळी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.