शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

रोहयों मजुरांना मिळणार बेरोजगार भत्ता

By admin | Updated: February 1, 2016 01:10 IST

रोहयो मजुरांनी काम मागितलेल्या तारखेपासून पंधरा दिवसाच्या आत मजुरांना कामाची उपलब्धता करून दिली नाही.

वडाळा (तु) : रोहयो मजुरांनी काम मागितलेल्या तारखेपासून पंधरा दिवसाच्या आत मजुरांना कामाची उपलब्धता करून दिली नाही. दोषी व्यक्तींकडून बेरोजगार भत्त्याची रक्कम वसूल करून मागणीदार मजुरांना वितरीत करावी, या आशयाचे पत्र उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांच्याकडून संवर्ग विकास अधिकारी भद्रावती यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यामुळे चिचोली येथील रोहयो मजुरांच्या बेरोजगार भत्त्याबाबत आशा वाढलेल्या आहे.भद्रावती तालुक्यातील चिचोली येथील मजुरांनी रोहयो कायद्यानुसार नमुना ४ भरून १५ एप्रिल ते ३० जून २०१५ पर्यंत असे एकूण ७५ दिवसाच्या कामाची मागणी केली. अर्ज प्राप्त झाल्याची नमुना ५ मधील रितसर पावती ग्रामसेवक यांच्याकडून घेतली. नियमानुसार काम मागितल्याच्या दिनांकापासून १५ दिवसाच्या आत काम उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे मजुरांनी बेरोजगार भत्ता मिळण्याबाबतचा अर्ज तालुका कार्यक्रम अधिकारी तथा तहसीलदार भद्रावती यांच्याकडे नमुना ८ मध्ये केला. संपूर्ण कार्यालयीन प्रक्रियेतून चौकशी करून मजुरांना १५ दिवसाच्या आत काम देण्यास दिरंगाई केल्याच्या कारणावरुन तत्कालीन संबंधित ग्रामसेवक व रोजगार सेवक यांना दोषी ठरविण्यात आले.सदर चौकशी अहवाल संवर्ग विकास अधिकारी यांनी उपजिल्हा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) चंद्रपूर यांना कार्यवाहीबाबत पाठविण्यात आला. सदर चौकशी अहवालानुसार या प्रकरणात दोषी आढळलेल्या ग्रामसेवक व रोजगार सेवक यांच्याकडून बेरोजगार भत्त्याची रक्कम वसूल करून संबंधित मजुरांना वितरित करावी व तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, अशा सूचना उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांनी ६ जानेवारी २०१६ रोजी संवर्ग विकास अधिकारी भद्रावती यांना केल्या आहेत. तसे पत्रही त्यांना पाठविण्यात आले आहे. त्यामुळे संवर्ग विकास अधिकारी तत्कालिन ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक यांच्याकडून बेरोजगार भत्त्याची रकम वसूल करून मजुरांच्या खात्यात जमा करण्यासाठी कोणती भूमिका घेतात, याकडे रोहयो मजुरांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)