सोईट येथील वर्धा नदीवरील पूल पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:27 IST2021-09-11T04:27:41+5:302021-09-11T04:27:41+5:30
माढेळी : येथून जवळच असलेल्या सोईट येथील वर्धा नदीवरील पूल पाण्याखाली आला आहे. त्यामुळे काही वेळेसाठी वाहतूक बंद करण्यात ...

सोईट येथील वर्धा नदीवरील पूल पाण्याखाली
माढेळी : येथून जवळच असलेल्या सोईट येथील वर्धा नदीवरील पूल पाण्याखाली आला आहे. त्यामुळे काही वेळेसाठी वाहतूक बंद करण्यात आली होती.
मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. या भागातून वाहणाऱ्या वर्धा नदीला वणा, पोथरा अशा मोठ्या उपनद्या येऊन मिळतात. त्यामुळे नदीचे पात्र मोठे होत जाऊन सोईट येथे अथांग अशी नदीचे पात्र तयार होते. या ठिकाणी असणारा पूल हा नदीच्या पात्राच्या अगदी बरोबर असल्यामुळे या नदीला पूर आल्याबरोबर पूल पाण्याखाली जात असतो. या मार्गे वरोरा-वडकी -राळेगाव अशी वाहतूक सतत सुरू असते; परंतु गुरुवारी पुलावरून पाणी असल्यामुळे काही काळासाठी वाहतूक ठप्प होती.
100921\screenshot_20210910_133820.jpg
सोईट येथील वर्धा नदीवरील पाण्याखाली गेलेला पुल